Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कामगारांच्या हितासाठी लढण्यासाठी युनियनची नितांत आवश्यकता - दादाराव डोंगरे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कामगारांच्या हितासाठी लढण्यासाठी  युनियनची नितांत आवश्यकता - दादाराव डोंगरे राष्ट्रीय जनरल मजदूर युनियन शाखा गडचांदूरच्या कार्यालयाचे उद्घाट...



  • कामगारांच्या हितासाठी लढण्यासाठी  युनियनची नितांत आवश्यकता - दादाराव डोंगरे
  • राष्ट्रीय जनरल मजदूर युनियन शाखा गडचांदूरच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
राष्ट्रीय जनरल मजदूर युनियन (इंटक) महाराष्ट्र राज्य चे राष्ट्रीय महासचिव दादाराव डोंगरे यांनी पिंपळगाव रोड गडचांदूर तालुका कोरपना येथे २ जानेवारी रविवारला संपन्न झालेल्या राष्ट्रीय जनरल मजदूर युनियन शाखा गडचांदूरच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. तद्नंतर झालेल्या सभेत डोंगरे यांनी बांधकाम, निर्माण, वनमजूर, रोजगार हमी योजना, घरकाम मजूर तसेच कुशल व अकुशल कामगारांचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय कामगार कायदेविषयक माहिती दिली तसेच कामगारांच्या हितासाठी व्यापक जनजागृती, जन आंदोलन करावे लागेल आणि अहिताचे होत असलेले कायदे यांचा सर्व स्तरातून व्यापक विरोध करण्यासाठी आपल्यातील संघटनशक्तीची अत्यंत आवश्यकता असते. म्हणून संघटित, असंघटित कामगारांच्या हितासाठी लढण्यासाठी संघटनशक्तीची, युनियनची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी युनियनची जास्तीत जास्त सभासद नोंदणी करुन आपल्या हिताच्या आड येणाऱ्या प्रवृतीचा विरोध करणे गरजेचे आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अशोककुमार उमरे, (सचिव, गडचांदूर तालुका संघर्ष समिती तथा मजदूर युनियन शाखा गडचांदूरचे सल्लागार) होते. असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी मुबलक प्रमाणात योजना असून भागत नाहीत तर त्या कल्याणकारी योजनेच्या हितासाठी झटणारा आणि त्या कल्याणकारी योजनेची जनजागृती करणारा कार्यकर्ता तयार झाल्यास सर्व सामान्य मोल- मजूरी करणारा वर्ग सुखासमाधानाने जगू शकतो असे प्रतिपादन केले.
यावेळी अंबुजा सिमेंट, उपरवाही येथील कामगारनेते विजय ठाकरे, मानिकगड सिमेंट, गडचांदूरचे बी. डी. सिंग, प्रियोबाला गावंडे चंद्रपूर, रमेश दुर्योधन चंद्रपूर, शाम गेडाम, राजू पिंपळवार यांनी समयोचित मार्गदर्शन केले. युनियनचे महाराष्ट्र अध्यक्ष जोगेश सोनडुले यांचे निधन झाले, त्याबद्दल कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांच्या बद्दल दुखवटा व्यक्त करुन श्रध्दांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विदर्भाचा वीरचे संपादक तथा मजदूर युनियन शाखा गडचांदूरचे सल्लागार प्रभाकर खाडे यांनी केले. शाखा गडचांदूरचे अध्यक्ष सुनिल फुलझेले यांनी उपस्थितांचे आभार मानले. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचांदूर शाखेचे उपाध्यक्ष शंकर भगत, उपाध्यक्ष नितेश नांदूरकर, सचिव देवानंद वाटगूरे, सहसचिव आकाश पेंदोर, कोषाध्यक्ष महेंद्र गिलबिले, सहकोषाध्यक्ष देविदास टेकाम, संघटक अनिल सिडाम, सहसंघटक-रवि मेश्राम, रेखा सुनील फुलझेले, संगिताबाई राजू उईके, ज्योत्स्ना वाघाडे, शेवंताबाई देवानंद वाटगूरे, वनिता देविदास टेकाम, शांताबाई जाधव, गंगूबाई मासेकर, प्रतिभा भगत, उज्वला प्रभाकर खाडे, धृपता गोरे, मधूकर सुर्यवंशी, परशूराम गेडाम नांदाफाटा, विजय नगराळे, आवारपूर, सित्रू लक्ष्मण कोवे बिबी, दिनेश साहू नांदाफाटा, रमेश मडावी, प्रकाश भैसारे, मुस्तफा शेख, ज्ञानोबा मंगले, रविंद्र भगत, पंढरी वनकर, विराज निवलकर, सुदाम कुमरे इत्यादींनी सहभाग घेऊन सहकार्य केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top