Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांचेवर गुन्हा दाखल करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांचेवर गुन्हा दाखल करा महानगर भाजपाची मागणी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन आमचा विदर्भ - ब...

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांचेवर गुन्हा दाखल करा
  • महानगर भाजपाची मागणी
  • जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
येथील भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे स्थानिक जटपूरा गेट परिसरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांचा निषेध नोंदविण्यासाठी निदर्शने करण्यात आली.आ.पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून भाजपा कार्यकर्त्यानी सोमवार दि. 24 जानेवारीला निषेध नोंदविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आ.पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व भाजपा जिल्हाध्यक्ष (श) डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात भाजपा संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, मनपा सभापती संदीप आवारी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, विठ्ठल डुकरे, संदीप आगलावे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना डॉ मंगेश गुलवाडे म्हणाले, काँग्रेस प्रदेधाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून वादग्रस्त विधान केले आहे. पंतप्रधानांचाच काय तर कुणाचाही अपमान करणे ही आपली संस्कृती नाही. साधी शिवी दिली तरी, गुन्हा दाखल करण्याची तरतूद आपल्या जगप्रिय संविधानात आहे. नाना पटोले यांच्या वारंवार वादग्रस्त विधानामुळे नागरिकांत असंतोष उफाळून देशात शांती भंग होऊन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नाना पटोलेंना हे माहीत असतांना जाणीवपूर्वक पंतप्रधानांचा अपमान वारंवार केला जात आहे. ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते' नाना पटोलेंचे हे विधान वादग्रस्त आहे.
'आपण मोदींना शिव्या देऊ शकतो, मोदींना मारू शकतो' असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या आठवड्यात केले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राज्यभर भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी (23 जानेवारी)ला पुन्हा त्यांनी नाशिक येथे बोलताना 'ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते', असे वादग्रस्त विधान केले. 
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी संबोधित करताना पटोलेंनी वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या प्रसिद्धीपारायणमुख अभियानाचा आम्ही निषेध करतो.
आ.नाना पटोले यांचेवर गुन्हा दाखल करून देशातील शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखावी,अन्यथा भाजपाला तीव्र छेडेल. असा इशारा त्यांनी दिला. आ पाटोलेंच्या असभ्यतेमुळे देशातील शांतता व सुव्यवस्था भंग झाल्यास याची सर्वस्व जवाबदारी शासनाची असेल. असेही ते म्हणाले.
आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी अरुण तिखे,भारती दुधानी, दीपक भट्टाचार्य, प्रभाताई गुळधे, प्रज्ञा बोरगमवार, विनोद शेरकी, धनराज कोवे, मोहमद जीलानी, नितीन गुप्ता, गणेश रामगुंडवार, कुणाल गुंडावार, सय्यद चांदभाई, रामकुमार आकपल्लीवार, विलास गुळढे, शीतल आत्राम, चंदन पाल, रितेश वर्मा, अभि वांढरे, मनोज पोतराजे, प्रवीण उरकुडे, अमित कासनगोट्टूवार, सत्यम गणार, अभिषेक तिवारी, जगदीश नंदूरकर, प्रशांत कोलप्याकवार आदिंनी परिश्रम घेतले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top