Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चिंचोली सुब्बई प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे वेकोलि जी एम कार्यालय पुढे आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चिंचोली सुब्बई प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे वेकोलि जी एम कार्यालय पुढे आंदोलन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - चिंचोली सुब्बई येथील 205 ...

  • चिंचोली सुब्बई प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे वेकोलि जी एम कार्यालय पुढे आंदोलन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
चिंचोली सुब्बई येथील 205 शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोली ने 10 वर्षांपासून अधिग्रहित करून ठेवल्या आहे. मात्र त्या बदल्यात नोकरी आणि मोबदला हा शेतकऱ्यांना अजून पर्यंत मिळालेला नाही. वेकोली कडून 2009 साली चिंचोली सुब्बई शेतजमिनी चा सर्व्हे करण्यात आला. त्या सर्व्हे मध्ये भूगर्भात कोळसा आहे असे वेकोली ला समजले. त्यांनतर त्यांनी सुबई गावात जनसुनावणी घेत 2 एकर मागे एक नोकरी आणि 8 लाख रुपये एकरी जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात येईल असे सांगितले. शेतकऱ्यांनी या प्रस्तावाला मान्यता देत पुढे वेकोली ने जमीन अधिग्रहण कायद्या अंतर्गत सेक्शन 4, सेक्शन 7, सेक्शन 9, आणि 2015 मधे सेक्शन 11 लावण्यात आले. नंतर वेकोलि कार्यालय बल्लारपुर तर्फे शेतकऱ्यांना सांगण्यात आले की तुम्ही सात बारा आणि 100 रुपयाचा स्टैम्प पेपर जमा करा करारनामा करण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपले कागदपत्र वेकोली कार्यालय बल्लारपूर (धोपटाला) येथे जमा केले. त्यांनतर वेकोली ने शेतकऱ्यांना कोळसा विकत घेणार ग्राहक नाहीत असे कारण देत उडवा उडवी चे उत्तर देत वेळ काढू पणा केला आणि शेतकऱ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा केला. असे करत 10 वर्ष लोटल्यांनतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय प्राप्त झाला नाही याकरिता आजवेकोलि बल्लारपूर क्षेत्राच्या जी एम कार्यालय पुढे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, अरुण सोमलकर, सतीश बेतावार, मारोती नेव्हारे, प्रवीण मेकरतीवर, वैभव वासेकर, विवेक तीतरे, पांडुरंग साळवे, शरद चापले, मनोज कुरवतकर, प्रसाद अंगलवार, संदीप निमकर हे प्रकल्पग्रस्त व गावकरी उपस्थित होते. स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते सूरज ठाकरे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top