Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अठ्ठावीस वर्षानंतर रामपुरातील दोन एकर जमिनीवर मिळाला ताबा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अठ्ठावीस वर्षानंतर रामपुरातील दोन एकर जमिनीवर मिळाला ताबा जिल्हा सत्र न्यायालयाचा २८ वर्षांनंतर निकाल कोट्यवधींची मालमत्ता वारसदारांना मिळाल...

  • अठ्ठावीस वर्षानंतर रामपुरातील दोन एकर जमिनीवर मिळाला ताबा
  • जिल्हा सत्र न्यायालयाचा २८ वर्षांनंतर निकाल
  • कोट्यवधींची मालमत्ता वारसदारांना मिळाली
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
शहराच्या सीमेलगत असलेल्या रामपूर येथील वैरागडे कुटुंबात आपसी वाद होता. या वादात एका शेत जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. दरम्यान, तब्बल २८ वर्षानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिला असून संबंधित वैरागडे यांच्या वारसदारांनी २ एकर जागेचा सोमवारी ताबा घेतला आहे. या निकालामुळे परस्पर शेतजमिनीचे तुकडे करून विकणाऱ्या कथित महाभागांना चांगलीच चपराक बसली आहे.
राजुरा शहरातील नाका नंबर ३ लगतच्या व भवानी मंदिराच्या समोरील गडचांदूर रोडला लागून असलेल्या सर्वे क्रमांक ३०/२ मधील दोन एकर शेतजमिनीचा वाद सुरू होता. यामध्ये मय्यत भगिरथाबाई भगवान वैरागडे यांचे वारसदार विजय भगवान वैरागडे, सुनंदा प्रकाश कुंभलकर, सुनीता पुरुषोत्तम खोब्रागडे व मय्यत लक्ष्मण भगवान वैरागडे यांचे वारसदार सुरेखा लक्ष्मण वैरागडे व मदन लक्ष्मण वैरागडे यांनी बाळकृष्ण भगवान वैरागडे व इतरांच्या विरोधात जिल्हा सत्र न्यायालयात दिवाणी दावा १९९३-९४ मध्ये दाखल केला होता. बाळकृष्ण वैरागडे यांनी काही लोकांना करारनामा करून
दिल्याची चर्चा आहे. सद्यस्थितीत त्याठिकाणी अठरा निवासी व वाणिज्य वापरात असलेल्या इमारती दिसून येत आहे. न्यायालयाने मय्यत भगिरथाबाई व लक्ष्मण वैरागडे यांच्या पाच वारसदारांच्या बाजूने निकाल देत तत्काळ त्या दोन एकर जागेवर कब्जा करण्यासाठी आदेश पारित केला व न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या देखरेखेखाली व पोलीस बंदोबस्तात सोमवारी सकाळपासून त्या जागेची मोजणी सुरू होती. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पाच वारसदारांना जागेचा कब्जा देण्यात आला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top