Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आमदार सुभाष धोटे यांनी दिल्या क्षेत्रातील गावांना भेटी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटे यांनी दिल्या क्षेत्रातील गावांना भेटी गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी करणार पाठपुरावा आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राज...

  • आमदार सुभाष धोटे यांनी दिल्या क्षेत्रातील गावांना भेटी
  • गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी करणार पाठपुरावा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील सास्ती - गोवरी जिल्हा परिषद क्षेत्रातील बाबापूर, मानोली, कढोली, चार्ली, निर्ली, धिडसी, मारडा, पेल्लोरा इत्यादी गावांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील गावकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याची हमी दिली. ते येणाऱ्या काळात क्षेत्रातील अनेक गावांना भेटी देणार असून या जनसंपर्क दौऱ्यांच्या माध्यमातून थेट जनतेत जाऊन त्यांच्या अडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा घेणार आहेत. वरील सर्व गावांमध्ये आमदार सुभाष धोटे यांचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले आणि उत्तम प्रतिसाद दिला.
यावेळी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज, लक्ष्मण ऐकरे, बळीराम वैध, राजुरा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष शेंडे, प्रा. प्रफुल्ल शेंडे यासह सर्व गावातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top