Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श मुलींनी समोर ठेऊन प्रगती करावी : प्राचार्या स्मिता चिताडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श मुलींनी समोर ठेऊन प्रगती करावी : प्राचार्या स्मिता चिताडे महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक ...

  • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श मुलींनी समोर ठेऊन प्रगती करावी : प्राचार्या स्मिता चिताडे
  • महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या स्मिता चिताडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे, उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक एच.बी. मस्की, शोभा जिवतोडे, एम,सी व्ही, सी विभागाचे प्रमुख प्रा. अशोक डोईफोडे, जेष्ठ प्रा. प्रफुल्ल माहुरे उपस्थित होते.
सर्वप्रथम अतिथीच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्या स्मिता चिताडे यांनी अध्यक्षीय भाषणातुन आजच्या मुलींनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेऊन मुलींनी शिक्षण पूर्ण करून प्रगती करावी असे सांगितले. याप्रसंगी प्रा. तब्बू शेख व प्रा. प्रगती आगे यांनी  सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. संचालन प्रा. तब्बू शेख यांनी केले तर आभार प्रा. मंजुषा टेकाम यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, आशा वर्कर मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दिनविशेष समिती च्या सदस्यांनी तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top