Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कॅथलिक चर्चला ८७ वर्षे पूर्ण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कॅथलिक चर्चला ८७ वर्षे पूर्ण एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपूर - बल्लारपूर-चंद्रपूर मार्गाला लागून असलेले बल्लारपूर येथ...

  • कॅथलिक चर्चला ८७ वर्षे पूर्ण
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
बल्लारपूर-चंद्रपूर मार्गाला लागून असलेले बल्लारपूर येथील कॅथलिक चर्च विदर्भातील महत्त्वपूर्ण आणि जुन्या चर्च मधील एक आहे. 1934 साली हे चर्च बांधण्यात आले. त्यावेळचे चंद्रपूर जिल्ह्यातील हे एकमेव चर्च होते. चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा हे तीन जिल्हे मिळून बनलेल्या ख्रिस्त धर्म प्रांताचे हे मुख्यालय होते. धार्मिक व सेवाभावी कार्याचे नियोजन येथून केले जाते. कॅथलिक चर्चला यंदा 87 वर्ष पूर्ण झाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या परिसरात रेल्वेमार्गाचे काम 1930 च्या दरम्यान सुरू झाले. त्याकरिता रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बल्लारपूर परिसरात मुक्कामाला राहावे लागत होते. त्यादरम्यान हे चर्च बांधण्यात आले. त्या काळात जंगलात गावाच्या शेवटच्या टोकाला हे चर्च होते. गावाचा विस्तार झाला आणि आज हे सर्वात जुने चर्च शहराच्या मध्यभागी आले आहे. काळानुरूप या चर्चचे वेळोवेळी मुख्य इमारतीचा गाभा (ढाचा) ठेवून नूतनीकरण व सौंदर्गीकरण करण्यात आले. चर्चच्या दर्शनी भागाच्या वर प्रभू येशूची आकर्षक प्रतिमा (शिल्प) आहे. काही वर्षापूर्वी ममत्वाचे प्रतीक असलेल्या माता मरियम यांचे शिल्प चर्चला लागून दर्शनी भागात बसविले. प्रभू येशूच्या शांतता व प्रमाचा संदेशानुसार समाज कार्यरत असून, हे कार्य या धर्म प्रांताद्वारे कायम सुरू राहील, असे बिशफ एफ्रेम नरीकुलम यांनी सांगितले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top