Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जेष्ठांना सन्मानपुर्णक वागणूक देने युवकांचे कर्तव्य - सुदर्शन निमकर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जेष्ठांना सन्मानपुर्णक वागणूक देने युवकांचे कर्तव्य - सुदर्शन निमकर ८९ व्या वर्षी सीताराम तुमराम यांचा कृतज्ञता सोहळा आमचा विदर्भ - ब्युरो र...

  • जेष्ठांना सन्मानपुर्णक वागणूक देने युवकांचे कर्तव्य - सुदर्शन निमकर
  • ८९ व्या वर्षी सीताराम तुमराम यांचा कृतज्ञता सोहळा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
म्हातारपण हे देवाने माणसाला बहाल केलेले दुसरे बालपण आहे. बहुतांश वेळा हे मनाला पटते देखील; लहान मुलांना जसे हवेहवेसे वाटतात तसेच वृद्धांनाही ते प्रिय असतात. काहीवेळा जबाबदारी कमी झाल्यामुळे विरंगुळा म्हणून वृध्द लोक मजेशीर गोष्टींत रमून जातात. मनुष्याचा वृद्धापकाळ हा नेहमी समाधानी आणि आनंदपूर्ण असायला हवा. त्यासाठी सामाजिक आणि कौटुंबिक सहाय्य त्यांना लाभले पाहिजे जेणेकरून शेवटची काही वर्षे त्यांना परमानंद मिळू शकेल. असा उदात्त हेतू लक्षात घेऊन तरुणपिढीने जेष्ठांना सन्मानयुक्त जगवणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी गोविंदपूर येथील सीताराम तुमराम यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्य आयोजित कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.
गोविंदपूर येथील मूळ निवासी व कोरपना येथे वास्तव्यास असलेले सीताराम गोदरुजी तुमराम यांचा 80 वा वाढदिवस नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी २०२२ होता. या शुभदिवसाचे औचित्य साधून त्यांचा मुलगा शिक्षक शत्रुघन तुमराम यांनी नातेवाईक, मित्रपरिवाराच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात वाडीलांचा कृतधन्यता सोहळा साजरा केला. 
या कार्यक्रमाला आदिवासी समाजाशी जुळलेले माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सीताराम तुमराम यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, कोरपना तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव मोहितकर, नपं कोरपणाचे माजी नगरसेवक अमोल आसेकर, शासकिय अर्धशासकीय सेवकांची पतसंस्था राजुरा चे मानद सचिव कैलास मैहस्के, मुख्याध्यापक विजय मसे, केंद्रप्रमुख एस.बी. चंदनखेडे, तलांडे गुरुजी, सोयाम गुरुजी व समाजबांधव उपस्थित होता.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top