आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
चंद्रपूर नागपूर महामार्गावर एका खासगी बस दुभाजक ओलांडून चंद्रपूर चा बाजूने येणाऱ्या ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचा समोरील भाग एकमेकांवर आदळला. यामध्ये दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सायंकाळी 5.30 वाजता घडली. नागपूर येथून हर्ष ट्रॅव्हल्सची बस क्र. एमएच 40 एटी 481 ही बस आज दुपारी सुमारे 40 प्रवाशांसह चंद्रपूरकडे निघाली. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार बसचा वेग जास्त होता. त्यामुळे प्रवाश्यांनी बसचालक साबीर शेख वय 45, रा. चंद्रपूर यांना बस सावकाश चालवण्याची विनंती केली. असे असतानाही तो भरधाव वेगाने गाडी चालवत होता. वरोरा येथील रत्नमाला चौकापासून सुमारे 300 मीटरवर बस येताच. त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस अनियंत्रित बस महामार्गावरील दुभाजक ओलांडत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच 40 बीजी 9540 वर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की बस आणि ट्रकचा समोरचा भाग केबिनमध्ये जाऊन आदळला. यामध्ये दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाला.
ग्राइंडर ने कापून दोन प्रवाशांना बाहेर काढले
दोन्ही वाहने एकमेकांच्या केबिनमध्ये घुसल्याने एक महिला आणि 15 वर्षीय मुलगी यात फसली. हे पाहून ग्राइंडरच्या सहाय्याने बस कापून दोघांनाही बाहेर काढण्यात आले. बसमधील सुमारे 13 जण जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णवाहिकेच्या सहाय्याने उपजिल्हा रुग्णालयात वरोरा येथे दाखल करण्यात आले आहे. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
जेसीबी आणि हायवाच्या सहाय्याने दोन्ही वाहने काढयन्यात आली. दोन्ही वाहने एकमेकांमध्ये खुपच अडकली. त्यामुळे चंदपूर नागपूर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र दोन्ही वाहने काढणे अवघड जात होते. त्यामुळे जेसीबी व हायवाची मदत घेण्यात आली.
प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी पोहोचले
घटनेची माहिती मिळताच एसडीओ सुभाष शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी, तहसीलदार रोशन मकवाने, एसएचओ दीपक खोब्रागडे आपल्या पथकासह दाखल झाले. सर्वप्रथम दोन्ही वाहने वेगळे करणे आणि मार्गावरील वाहतूक सुरळीत करणे आवश्यक होते. त्यामुळे इतर जखमींची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात पाठविण्यात आले व शहरातील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.