- अल्ट्राटेक सिमेंट कंत्राटी कामगारांचे आंदोलन समाप्त
- विजय क्रांती कामगार संघटनेच्या आंदोलनाला यश
- कंत्राटी कामगारांसाठी विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटना घेणार पुढाकार
- बघा व्हिडीओ
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
मागील सात ते आठ दिवसापासून आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कारखान्यामध्ये कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले होते. सात आठ दिवस लोटूनही जिल्हा प्रशासन यांनी मध्यस्थी करून सुद्धा तोडगा मात्र निघत नव्हता, त्यामुळे आंदोलन कोणत्या दिशेला जाईल हे ठरवणे दुरापास्त झाले होते. यातच सिमेंट कारखान्याचे दिवसागणिक होणारे लाखोचे नुकसान व कामगारांचा बुडत असलेल्या रोजगार अशाप्रकारचे गहन प्रश्न निर्माण झाले होते. करिता अनेक वेळा बैठका पार पडल्या. शेवटी दिनांक 18-12-2021 रोजी रात्री उशिरा कंपनीच्या प्रशासकीय भावनांमध्ये कंपनीमध्ये कार्यरत असलेले सर्व कंत्राटदार विजय क्रांती कामगार संघटनेच्या वतीने जिल्ह्याचे पदाधिकारी विजय ठाकरे, महासचिव सुनील ढवस, उपाध्यक्ष दशरथ राऊत व इतर पदाधिकारी तसेच सिमेंट व्यवस्थापनाचे मुख्य अधिकारी यांच्यामध्ये बैठक पार पडली. बैठकी दरम्यान आदित्य बिर्ला समूहाचे मुख्याधिकारी व कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्यात भ्रमणध्वनीवरून थेट वार्तालाप झाल्याचे समजते. कंपनीचे होत असलेले करोडो चे नुकसान आणि कामगारांचा बुळत असलेला रोजगार याविषयी चर्चा झाल्यानंतर सर्वच कंत्राटदारांच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांच्या समस्या चर्चेच्या माध्यमातून सोडवन्याचे लिखित अभिवचन अल्ट्राटेक सिमेंट प्रशासनाच्या माध्यमातून कंत्राटदारांच्या स्वाक्षरी निशी दिल्यावर कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.
भविष्यात काही दिवसातच कंत्राटी कामगारांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील या सबबीखाली आंदोलन तूर्तास मागे घेण्यात येऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारखाना सुरू करण्यात आला. यामुळेच कंत्राटी कामगार वर्गामध्ये वर्गामध्ये एक प्रकारचे संतोष युक्त वातावरण तयार झाले असून विजय क्रांती कामगार संघटनेचे सर्वांनी आभार मानले.
जिल्ह्याचे पालक मंत्री विजय वडेट्टीवार तसेच विजय क्रांती कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार यांच्या निर्देशानुसार कामगार संघटनेतील सर्व पदाधिकारी आणि विशेष म्हणजे कामगार बांधवांनी तब्बल सात दिवस आपल्या घरादाराची मुलाबाळांची चिंता न करता आंदोलन स्थळी केलेले सहकार्य दिले, यामुळेच हे आंदोलन यशस्वी होऊ शकले. यापुढे ही सर्वांना सोबत घेऊन कामगारांच्या बाबतीत निर्णय घेतले जातील.विजय ठाकरे - जिल्हाध्यक्ष, विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनासगळं यश कामगार सहकार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचा आहे. यापुढे संघटना नेहमी कामगाराच्या हिताचाच विचार करेलसुनील ढवस - महासचिव विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटना
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.