Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भरधाव वेगाने जाणारी चारचाकी उड्डाणपुला वरून कोसळली ; दोन मृत; दोन जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भरधाव वेगाने जाणारी चारचाकी उड्डाणपुला वरून कोसळली दोन मृत; दोन जखमी  शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपुर - दारूच्या नशेत असलेल्या यु...
  • भरधाव वेगाने जाणारी चारचाकी उड्डाणपुला वरून कोसळली
  • दोन मृत; दोन जखमी 
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपुर -
दारूच्या नशेत असलेल्या युवकांचे वाहन शहरातील बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलावरून कोसळल्याची धक्कादायक घटना आज रविवारी घडली असून यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. अभिषेक गुप्ता असे मृताचे नाव असून दुसऱ्या युवकाचे नाव अद्याप कळू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार बल्लारपूरहून हे युवक दारूच्या नशेत धुंद अवस्थेत कार क्रमांक MH34 BR 0141 ने चंद्रपुरात येत होते अशातच बाबूपेठ येथील रेल्वे उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने कार चालवीत असताना वाहनवरील नियंत्रण सुटले व वाहन पुलावरून खाली कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top