शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या लोकलेखा समीतीचे अध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार व भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा बंगाली समाज आघाडीचे अध्यक्ष डॉ दिपक भट्टाचार्य यांनी कृष्ण नगर येथे निःशुल्क हाडांचा ठिसुळपणा व कॅल्शियम चे प्रमाण तपासणी शिबिर आयोजित केले, शिबिराचे उद्घाटन भाजपा महामंत्री व नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या हस्ते झाले या शिबिरात ११५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली व अस्थीरोग तज्ञ डॉ निखिल माडूरवार यांनी निःशुल्क चिकित्सा व मार्गदर्शन केले, याप्रसंगी भाजपा महाराष्ट्र राज्य निमंत्रित सदस्य तुषार सोम, नगरसेविका सौ वंदना जांभुळकर, मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, भाजपा सचिव चंदनदादा पाल यांची उपस्थिती होती.
शिबिराच्या यशस्वितेसाठी भाजपा बंगाली आघाडी चे महामंत्री कृष्णकांत पोद्दार, कृष्ण कुंडू, उपाध्यक्ष सौ कविता सरकार, बिमल शहा, सचिव सपन सरकार, कृष्ण मंडल, सुशांत भद्रा, गिरीश कंठीवार, बिरेंद्र सिंह, आकाश म्हस्के यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.