Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: समाज माध्यमांवर धार्मिक व जातीय भावना दुखावणारे संदेश प्रसारित करण्यास प्रतिबंध
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
समाज माध्यमांवर धार्मिक व जातीय भावना दुखावणारे संदेश प्रसारित करण्यास प्रतिबंध रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - कोणत्याही प्रका...


  • समाज माध्यमांवर धार्मिक व जातीय भावना दुखावणारे संदेश प्रसारित करण्यास प्रतिबंध
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
कोणत्याही प्रकारे धर्म, भाषा, जात किंवा जनसमाज यांच्या किंवा अन्य कोणत्याही कारणावरुन निरनिराळे धार्मिक, वंशिक, भाषिक, किंवा प्रादेशिक गट अगर जनसमाज यांच्यामध्ये तेढ अथवा शत्रुत्वाच्या, व्देषाच्या भावना निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा वा अनधिकृत माहिती विविध समाज माध्यमामधून तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहतील असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज निर्गमित केले आहेत.
सदर आदेशात निरनिराळे धार्मिक, भाषिक, किंवा प्रादेशिक गट अगर जाती अगर जनसमाज यांच्यामध्ये एकोपा टिकण्यास बाधक अशी आणि ज्यामुळे सर्वाजनिक प्रशांतता बिघडते किंवा बिघडणे संभाव्य असते अशा पोस्ट विविध समाज माध्यमामधून तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायदयान्वये कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहील, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच एखादी व्यक्ती सार्वजनिक उपद्रव, अपराध करण्यास प्रवृत्त होईल अशा प्रकारे जनतेमध्ये अथवा जनतेपैकी एखाद्या भागामध्ये भीती किंवा भयग्रस्त वातावरण निर्माण होईल किंवा त्यामुळे तसे होण्याची शक्यता असेल किंवा एखादया समुहातील व्यक्तींना दुस-या कोणत्याही वर्गाविरुध्द किंवा
समूहाविरुध्द कोणताही अपराध करण्यास चिथावणी देण्याचा उद्देश असेल किंवा चिथावणी दिली जाण्याची शक्यता असेल अशा पोस्ट विविध समाज माध्यमामधून तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायदान्वये कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहील.
विविध समाज माध्यमामधून तसेच सोशल मिडीयावर जो कोणी व्यक्ती, संस्था, संघटना हा अॅडमिन म्हणून कार्यरत असेल त्यांनी त्यांचे गृपवर कोणत्याही प्रकारच्या प्रक्षोभक पोस्ट प्रसारीत होणार नाहीत या बाबत काळजी घ्यावी. अन्यथा सदर अॅडमिन नियमानुसार कारवाईस प्राप्त
राहील. आदेशाची अवज्ञा करणा-यांवर भारतीय दंड संहिताच्या कलमान्वये कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top