Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कराटे स्पर्धेत तन्वी रामटेकेचे सुयश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कराटे स्पर्धेत तन्वी रामटेकेचे सुयश विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - मुल तालुका व जिल्हा कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्...

  • कराटे स्पर्धेत तन्वी रामटेकेचे सुयश
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
मुल तालुका व जिल्हा कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मुलच्या क्रीडा संकुलमध्ये झालेल्या स्पर्धेत राजुरा शहरातील तन्वी सुनिल रामटेके या मुलीने रजतपदक पटकावित सुयश संपादन केले आहे. या विदर्भ स्तरीय कराटे स्पर्धेत नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वणी, बल्लारपूर, राजुरा येतील ४०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात फाईटच्या वजनगटात रजित बुऱ्हाण, प्रथमेश पचारे या मुलांनी सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच राजू साईनवार, गलेश कुकडे, चैतन्य जेणेकर यांनी रजत व शुभंकर देशपांडे, श्वेता नंदिगमवर, वडकर यांनी कांस्यपदक पटकावले. मुलींमध्ये तन्वी रामटेके, अशमी लोखंडे या स्पर्धकांनी रजत व तक्षु कडुकर, समृद्धी पेटे, सुरेखा अलोने या मुलींनी कांस्यपदक प्राप्त करीत सुयश संपादन केले. या स्पर्धकांना प्रशिक्षक प्रकाश पचारे यांनी प्रशिक्षण दिले. तन्वी रामटेके या मुलींनी या यशामागे प्रशिक्षकासह आईवडिलांचे मार्गदर्शन लाभले असे म्हटले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top