Home
»
चंद्रपूर मनपा
» चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात थुंकणाऱ्या विरोधात महानगरपालिकेच्या पथकाने आकाराला दंड
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या दोन नागरिकांविरोधात महानगरपालिकेच्या पथकाने चारशे रुपयांचा दंड आकारला. तसेच मा. मुख्य न्याय दंडाधिकारी एस. एम. काळे यांनी थुंकणाऱ्या नागरिकांना दोन तासांसाठी कोठडीत ठेवण्याची शिक्षा सुनावली.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. असे असतानाही अनेक जण सार्वजनिक ठिकाणी थुंकतात. अशांवर निर्बंध घालण्यासाठी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या लोकांच्या सवयीला आळा घालण्यासाठी आणि त्यांना मास्क वापरण्याची सवय लावण्यासाठी आता चंद्रपूर महानगरपालिका कठोर कारवाई करीत आहे.
सध्या कोरोनाचे संकट आहे. अशावेळी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कोविडचे विषाणू हवेत पसरून रोगराई पसरण्याची भीती असते. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीच्या नियमावलीत सोशल डिन्स्टन्सिंग राखणे, हात साबणाने वारंवार धुणे आणि मास्कचा वापर या अनिवार्य गोष्टी आहेत. मास्कमुळे विषाणूचा फैलाव नियंत्रणात येईल. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या लोकांच्या सवयीला आळा घालण्यासाठी आणि मास्कची सवय लावण्यासाठी आता चंद्रपूर महानगर पालिका कठोर पावले उचलली आहेत.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना कायदेशीर तरतुदीनुसार केवळ २०० रुपयांऐवजी १२०० रुपयांचा दंड आकारण्याच्या सूचना न्यायालयाने ७ एप्रिल २०२१ रोजी दिल्या होत्या. मदत व पुनर्वसन विभागाच्या २७ मार्च २०२१ रोजीच्या आदेशान्वये थुंकणे व विनामास्क याबाबत कठोर दंड वसूल करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:चे संरक्षण करणे आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
Advertisement

Related Posts
- पर्यावरणपुरक ई-बस दळणवळणाचे उत्तम साधन बनेल14 Oct 20240
पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वासपीएम ई-बससेवेंतर्गत इलेक्ट्रिक बस डेपोचे भू...Read more »
- चंद्रपुरात मराठा समाज व खुल्या प्रवर्गांचे सर्वेक्षण पूर्ण04 Feb 20240
४ हजार ९०९ घरे बंद तर; ४८८ कुटुंबियांचा माहिती देण्यास दिला नकारआमचा विदर्भ - दीपक शर्माचंद्रपूर (दि...Read more »
- झरपट नदी व शहरातील नाल्यांची सफाई तातडीने करा21 Jul 20230
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मनपा आयुक्तांना निर्देशआमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारेचंद्रपूर (दि...Read more »
- ८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले19 Jul 20230
चंद्रपूर मनपाने राबविली आपत्ती व्यवस्थापन मोहीम१२ मनपा शाळांत नागरिक आश्रयासआमचा विदर्भ - दीपक शर्मा...Read more »
- डेंग्यु व इतर कीटकजन्य आजारांपासुन सावध रहा11 Jul 20230
एक दिवस 'कोरडा दिवस' पाळाचंद्रपूर महानगरपालिकेचे आवाहनआमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारेचंद्रपूर (दि. १...Read more »
- पीएम स्वनिधी योजना अंतर्गत ३४१६ पथविक्रेत्यांना मिळाला लाभ27 Mar 20230
पथविक्रेत्यांसाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा६०४ लाभार्थ्यांनी घेतला रुपये २० हजार कर्जाचा...Read more »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.
EmoticonClick to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.