- चापले कुटुंबियांचे कार्य समाजसाठी नवी दिशा देणारे - अभिजित धोटे
- कुपोषणमुक्ती - वाढदिवसानिमित्त बाळु आहार किटचे वितरण
- 10 कुपोषित बाळांना 'बाळू' पोषण आहार किट भेट
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
सौ. शिला उद्धव चापले व सौ. सुनीता गौरव चापले यांचे तर्फे श्रीयांश चापले यांचे प्रथम वाढदिवसा निमित्य 10 कुपोषित बाळांना बाळू भेट देण्यात आली प्रसंगी गौरव चापले, उद्धव चापले यांचे कुटूंबीय, तरुण उभरते नेते अभिजित धोटे, अक्षय सूर्तेकर, सुपरवायझर नवरखेडे मॅडम, अंगणवाडी सेविका व कुपोषित बालकांचे पालक उपस्थित होते. बाळू च्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची संधी उपलब्ध झाल्या बद्दल बाळू चे अमित महाजनवार व सर्व बाळू स्वनसेवकांचे गौरव चापले यांनी आभार मानले. यावेळी कुपोषण मुक्तीकरिता वाढदिवसाप्रसंगी बाळु आहार किटचे वितरण करणाऱ्या गौरव चापले यांचे कार्य समाजसाठी दिशा देणारे आहे असे प्रतिपादन अभिजित धोटे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.