विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनई 136 तालुका शाखा राजुरा तर्फे पंचायत समिती राजुरा येथून बदली झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश खरवडे, सरचिटणीस पुंडलिक ठाकरे, राज्य समन्वयक सीताराम मरापे उपस्थित होते. कार्यक्रमात निरोप समारंभाचे प्रमुख सत्कार मूर्ती व प्रमुख अतिथी म्हणून तत्कालीन गट विकास अधिकारी डॉ. ओमप्रसाद रामावत, कृषी अधिकारी महेंद्र डाखरे, विस्तार अधिकारी मिलिंद कुरसंगे, नरेंद्र पेटकर, अरुण मेश्राम हे सत्कार मूर्ती म्हणून उपस्थित होते.
तसेच राजेश म्हस्के, मिलिंद देवगडे, दिपक बडवाईक, एकनाथ मेश्राम, सारिका गाडगे, दर्शना मोटघरे, रामदास राठोड, गणेश मुंडरे, रमाकांता पराते, खुशाब मानपल्लीवार, प्रविण कडूकर, प्रमोद तीमांडे, संतोष घाटे, भुमेश्वर हुमे, प्रभाकर पेरकीवार, वामन चौधरी, प्रमोद बारसागडे हे सर्व बदलून गेलेले ग्रामसेवक ग्रामसेविका सत्कार मूर्ती म्हणून आवर्जुन उपस्थित होते.
सदर निरोप समारंभ प्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना शाखा राजुराचे अध्यक्ष अमरदिप खोडके, कार्याध्यक्ष रवी बोढे,
सचिव उमेश आकुलवार, उपाध्यक्ष आशिष चात्रेश्वर, महिला उपाध्यक्ष कू. रसिका करडभुजे, कोषाध्यक्ष गोपाल नैताम, संघटक सुनील कुमरे, सहसचिव दयानंद तिडके, सल्लागार प्रकाश शेंडे, सह.सल्लागार गणेश राठोड, प्रसिद्धी प्रमुख विवेक वाळके, कार्यकारिणी सदस्य मोरेश्वर कोमटी, निलेश डवरे, कू. मंजुषा पारखी, कू. रज्जू थोरात तसेच सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती राजुरा येथील सर्व अधिकारी, कर्मचारी लाभले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती असलेले डॉ.ओमप्रसाद रामावत यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना पंचायत समिती राजुरा येथे कार्यरत असतांना आलेल्या अनुभवांचे व घडामोडींचे सविस्तर कथन करून जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच मार्गदर्शन केले व संधी मिळाली तर पुन्हा जिप चंद्रपूर येथे उप. मुख्य अधिकारी पंचायत व अती. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच कृषी अधिकारी महेंद्र डाखरे यांनी सुद्धा आपल्या आठवणींना शब्दांमध्ये व्यक्त केले, मिलिंद कुरसंगे विस्तार अधिकारी पंचायत, नरेंद्र पेटकर विस्तार अधिकारी कृषी, अरुण मेश्राम विस्तार अधिकारी आरोग्य, रवींद्र रत्नपारखी व आनंद नेवारे कार्यरत विस्तार अधिकारी पंचायत यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा अध्यक्ष महोदय खरवडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्रामसेवकांनी आपल्या कार्यक्षेत्रात काम करतांना धीटपणाने व खंबीर राहून काम करून आलेल्या समस्यांना तोंड देण्याचे आवाहन केले. व जिल्हा संघटना सर्वांसोबत खंबीरपणे सर्वांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही दिली. सोबतच ग्रामसेवक दिपक बडवाईक, मिलिंद देवगडे, संतोष घाटे आदींनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
या निरोप समारंभाचे प्रास्ताविक अमरदीप खोडके तालुका अध्यक्ष यांनी केले तर सूत्रसंचालन आशिष चात्रेश्र्वर यांनी केले तर आभार प्रदर्शन सिताराम मरापे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती राजुरा येथील सर्व ग्रामसेवक ग्रामसेविका यांनी मोलाचे सहकार्य केले. व निरोप समारंभाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.