- देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त श्रमकार्ड केंद्र सुरू
- गोवरीत सुशासन दिन साजरा करत जिप सभापती सुनील उरकुडे यांचेकडून अभिवादन
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
देशाचे माजी पंतप्रधान श्रध्येय अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिन म्हणून साजरी करण्यात आली. जिप चे कृषि व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्या प्रयत्नातून गोवरीत केंद्र सरकार द्वारा संचालित श्रम कार्ड केंद्र जनसंपर्क कार्यालयातच सुरू करून जनतेला सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी पंतप्रधान श्रध्येय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पूजन करून आदरांजली वाहिन्यांत आली. त्यानंतर फीत कापून सेवाकेंद्राचे उदघाटन करण्यात आले व त्वरित कार्ड तयार करण्याच्या मोहिमेला सुरुवात करून काही लाभार्थ्यांना याप्रसंगी कार्डचे वितरण वाटप सुद्धा करण्यात आले. याप्रसंगी सभापती उरकुडे यांनी मोदी सरकार द्वारा राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांची माहिती उपस्थितांना करून दिली.
यावेळी कार्यक्रमाला माजी सरपंच सौ. पौर्णिमा उरकुडे, ग्रापं सदस्य शंकर बोढे, विठ्ठल चिंचोलकर, विठ्ठल दरेकर, हर्षल वनकर, मनोज उरकुडे, गजानन बोढे, मयूर उरकुडे, मनीषा जमदाडे, बरूला टेकाम, गीता आत्राम, अनिता उरकुडे आदी नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.