शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
ख्रिसमसनिमीत्य आंद्रिय चर्च येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने केक व मिठाई वाटप करत ख्रिश्चन बांधवांना ख्रिसमस च्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युवा शहर संघटक कलाकार मल्लारप, शहर संघटक अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे युथ प्रमूख राशेद हुसैन, हरमन जोसेफ, विनोद अनंतवार, तिरुपती कलगुरुवार, अमन खान, रंकित वर्मा, श्रीकांत गजपाका, शुभम बोरकूटे आदिंची उपस्थिती होती.
आज शनिवारी ख्रिसमस निमीत्य शहरातील चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमीत्य दरवर्षी प्रमाणे यंदाही आंद्रिय चर्च येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळच्या सूमारास चर्चमध्ये प्रेयर करण्यासाठी आलेल्या ख्रिश्चन बांधवांना यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मिठाई व केक वाटप करुन त्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या युवक आघाडीच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.