Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतून आपले आयुष्य घडवावे - नरेश पुगलिया
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतून आपले आयुष्य घडवावे - नरेश पुगलिया कर्मवीर दादासाहेब कन्नमवार ग्रंथालयाचे व अभ्यासिकेचे उद्घाटन आमचा विदर्...
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतून आपले आयुष्य घडवावे - नरेश पुगलिया
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार ग्रंथालयाचे व अभ्यासिकेचे उद्घाटन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
जगात सर्वच बाबतीत प्रचंड स्पर्धा आहे. मात्र शैक्षणिक क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थी पुणे - मुंबई च्या तुलनेत कुठेही मागे नाहीत, परंतु त्यासाठी त्यांच्या मनातील न्यूनगंड काढून त्यांच्यासाठी अद्यावत अभ्यासिका आणि ग्रंथ व अन्य साधने उपलब्ध झाली पाहीजे. राजुरा सारख्या तालुक्याच्या गावी या सर्व सोई उपलब्ध होत असून ही समाधानाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी खूप परिश्रमपूर्वक अभ्यास करावा आणि आपले ध्येय गाठून जीवन यशस्वी करावे, असे प्रतिपादन माजी खासदार नरेश पुगलीया यांनी किसान भवन राजुरा येथे आयोजित कर्मवीर दादासाहेब कन्नमवार ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी केले.
बल्लारपूर पेपर मिल मजदुर ट्रस्ट, चंद्रपूर यांच्या सहकार्याने माजी खासदार नरेश पुगलीया यांच्या सहयोगातून तयार झालेल्या अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी नरेश पुगलिया बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी गोंडवाना विद्यापीठचे माजी कुलगुरू डॉ.विजय आईचवार होते. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी माजी आमदार अँड.संजय धोटे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष सुधाकर कुंदोजवार, संचालक दत्तात्रय येगिनवार, सचिव अविनाश जाधव, संचालक डी. बी. भोंगळे, साजिद बियाबानी, गजानन गावंडे, वसंत मांढरे, अँड.अरुण धोटे, तारासिंह कलशी, चंद्रशेखर पोडे, एस.नायर, देवेंद्र बेले, नगरसेवक अशोक नागापुरे, अजय मानवटकर, सिद्धार्थ पथाडे उपस्थित होते. 
डॉ. विजय राईंचवार यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविण्याच्या विविध उपक्रमांची माहिती देत बहुमोल मार्गदर्शन केले. संस्था सचिव अविनाश जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थी अनिरुद्ध डाखरे, कोमल मीना यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम.वरकड यांनी केले. संचालन प्रा.बी.यू.बोर्डेवार व आभार डॉ. राजेश खेरानी यांनी मानले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top