आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपुर -
मार्शल आर्ट अँड स्कूल गेम असोसिएशन तर्फे पहिली महाराष्ट्र स्तरीय कुंफू कराटे खुले चॅम्पियनशिप २०२१, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृह, नगर भवन, वणी, जिल्हा यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय राज्य गृहमंत्री हंसराज अहिर व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत विविध जिल्ह्यातून खेळाडूंनी भाग घेतला होता. ज्युबली हायस्कूल, चंद्रपूर येथे मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी या स्पर्धेत अतिशय चांगले यश प्राप्त केले.
स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाचे मानकरी सुबोध ढावरे, विराज (बॉबी) पुणेकर, स्वरूप मोहुर्ले, नारायणी सोनटक्के, पुष्पा काचोले हे ठरलेत. त्याचप्रमाणे रोप्य पदकाचे मानकरी स्वाती शृंगारपुरे, रिदम कोटकर, सावरी नगराळे, लक्की नंदाने, शीतल मेश्राम, स्वरनिक पारोजी हे ठरलेत. तसेच कांस्य पदकाचे मानकरी नंदकिशोर बल्लारवार, भारती संगेल, शुभम मोरे, प्रणाली निखारे, सौम्यता शिंगारवार, क्रिश महासाहेब, अनुष्का रंगदाल, गहना शिंगारपवार, तन्मय खोब्रागडे, वैष्णवी झोडे, हर्षाली झोडे, कांचन झोडे, सिद्धांत रामटेके, भानू नंदाने, हर्षल रामटेके, विभूत देवगडे, प्रियंका वाघमारे, स्वाती देशकर, काव्या काचोले, अश्विनी आवळे, प्रयास अडपेवार व नीतू गौंड हे मानकरी ठरले. तसेच चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन या कॅटेगिरी मध्ये नारायणी सोनटक्के हिने तिसरे स्थान पटकाविले. सर्व खेळाडूने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक विनोद पुणेकर व आपल्या आई-वडिलांना दिले.
या स्पर्धेचे आयोजन व सहकार्या करिता विनोद पुणेकर, रोशनी पुणेकर, निर्धार असुटकर, आशिष रिंगने व नवनीत मून यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.