Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ग्राम पंचायत कार्यालयासमोर महिलेला शिवीगाळ करीत मारहाण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महिलेला ग्राम पंचायत कार्यालयासमोर शिवीगाळ करीत मारहाण पोलिसांवर थातूरमातूर कारवाई केल्याचा आरोप विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राज...

महिलेला ग्राम पंचायत कार्यालयासमोर शिवीगाळ करीत मारहाण
पोलिसांवर थातूरमातूर कारवाई केल्याचा आरोप
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा शहरालगत असलेल्या बामनवाडा गावात एका दलित महिलेला भर रस्त्यात जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करतांना या पीडित महिलेचे केस ओढण्यात आले व कपडे फाडले.या घटनेची पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पण तिच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत तक्रारीत बदल करून दिशाभूल केली व अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचा आरोप पीडित महिलेने पत्रकार परिषदेत केला आहे. गावात नाटक पाहण्यासाठी गेलेला पती घरी आला नाही म्हणून शोधण्यासाठी पत्नी सुमन धोंगडे ही ग्रामपंचायत परिसरात आली. त्यावेळी पती देवानंद धोंगडे हे शेकोटी जवळ होते. त्यांच्या सोबत सदाशिव पाल देखील होते. धोंगळे पतिपत्नीमध्ये संभाषण सुरू असतांना सदाशिव पाल यांनी सुमन धोंगडे हिला
जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. महिलेचे केस ओढत जमिनीवर पाडले. या मानहानी दरम्यान महिलेची साडी सुटली. पत्नीला मारहाण करीत असतांना पती मात्र बघत होता. उपस्थित जनतेनी महिलेला मारहाणीपासून वाचवित या महिलेला घरी नेले. यानंतर घटनेची तक्रार देण्यासाठी पीडित महिला राजुरा पोलिस ठाण्यात गेली असता तिने सांगितलेली घटना लिहिली नाही आणि दिशाभूल केल्याचा आरोप महिलेने केला आहे. विशेष म्हणजे दलित महिलेवर भर रस्त्यात अन्याय झाला असतांना सुध्दा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून संवेदनहीनता दाखवली. या प्रकरणी पोलिस कारवाई करण्यास बगल देत असल्याचे लक्षात येताच गावातील 50 पेक्षा जास्त महिलांनी उप विभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धडक दिली. रात्री उशिरापर्यंत या महिला पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात होत्या.
न्याय मिळवून द्या, अन्यथा आत्महत्या करणार!
पीडित महिलेने पत्रकार परिषद घेऊन आपबिती कथन केली. मी सांगितलेली तक्रार न घेता त्यात बदल करून दिशाभूल केली असा आरोप महिलेने केला आहे. भर रस्त्यात मला अपमानित करण्यात आले आहे. त्यामुळे मला न्याय मिळवून द्यावा अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा पीडित महिलेने दिला आहे. आरोपीने या महिलेचे उपटलेले डोक्याचे केस पीडित महिलेने पत्रकारांना दाखविले. या गंभीर घटनेनंतर गावातील महिला आक्रमक झाल्या असून पोलीस राजकीय दबावात काम करीत असल्याचा आरोप केला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top