Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा तालुका ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचा वरचष्मा ; 5 पैकी 4 जागेवर शिवसेनेचे उमेदवार विजयी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रामपुर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये शिवसेनेने गड राखून माहागडच्या भगवा फडकवला राजुरा तालुका ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचा वरचष्मा 5 पैकी 4 जाग...

  • रामपुर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये शिवसेनेने गड राखून माहागडच्या भगवा फडकवला
  • राजुरा तालुका ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचा वरचष्मा
  • 5 पैकी 4 जागेवर शिवसेनेचे उमेदवार विजयी
  • पहिल्यांदाच निवडणूक लढवलेल्या विरूर येथे एका जागेवर निसटता पराभव
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा विधानसभेत ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका पार पडल्या. यामध्ये शिवसेनेचे सास्ती येथे 2 उमेदवार, रामपूर येथे 1 उमेदवार, हरदोना येथे 1 उमेदवार असे एकूण 4 उमेदवार विजयी झाले. तर विरूर येथील एका जागेवर पहिल्यांदाच निवडणूक लढून निसटता पराभव झाला.
जिल्ह्यातील नगरपंचायत आणि ग्रामपंचायत पोटनिवडणूकित शिवसेना ताकदीने उतरलेली दिसली. शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात आणि शिवसेना राजुरा तालुका प्रमुख वासुदेव चापले, शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे व शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे यांच्या नेतृत्वात सर्वत्र भगवी लाट निर्माण जाल्याचे चित्र निर्माण झाले. राष्ट्रीय पक्षांची तळजोळ सुरु असताना शिवसेनेने मात्र स्वबळावर ही निवडणूक अटीतटीची बनवली. त्याचीच प्रचिती म्हणून आज ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले. 
रामपूर हा शिवसेनेचा गड रामपुरातील निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची, हा सेनेचा बालेकिल्ला नाही तर महा बालेकिल्ला असल्याचे  शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे यांनी सिद्ध करून दाखविले. या पोटनिवडणुकीत विरोधकांकडून माजी आमदारांनी सुद्धा प्रचार केला होता मात्र किंग मेकर शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे यांच्या रणनीतीसमोर त्यांचा प्रचार कामी येऊ शकला नाही. 
रामपूर वॉर्ड नं. ३ मधून लता डाखरे, हरदोनातुन किसन टेकाम तर सास्ती मधून मुरारी बुगावार व पौर्णिमा भटारकर विजयी झाले. विजयी उमेदवाराचे शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, शिवसेना राजुरा तालुका प्रमुख वासुदेव चापले, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, उपतालुका प्रमुख रमेश पेटकर, महिला उपसंघटिका सरिता कुडे, माजी संघटक नरसिंग मादर, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, ग्रापं सदस्य कुणाल कुडे, माजी तालूका प्रमुख जीवन बुटले, माजी सरपंच रामपूर रमेश कुडे, अजय सकिनाला, रवी बोतुल्ला, उत्तम गिरी, अतुल खनके, कोमल फुसाटे, महादेव खंडाळे आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top