Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बामणवाडा येथील महिला मारहाण प्रकरणी विनयभंग व ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करा भीम आर्मीची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बामणवाडा येथील महिला मारहाण प्रकरणी विनयभंग व ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करा भीम आर्मीची मागणी - अन्यथा आंदोलन  विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प...

  • बामणवाडा येथील महिला मारहाण प्रकरणी विनयभंग व ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करा
  • भीम आर्मीची मागणी - अन्यथा आंदोलन 
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील बामणवाडा येथील एका अनुसूचित जातीच्या महिलेला बेदम मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी राजुरा पोलिसांनी आरोपीवर ॲक्ट्रासिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा चंद्रपूर जिल्हा भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी येथे येऊन पोलीस उपविभागीय अधिकारी राजा पवार आणि ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
बामणवाडा येथील निवासी सौ.सुनिता देवानंद घोगडे या पीडितेने बामणवाडा येथील सदाशिव पाल यांचे विरुद्ध राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी आरोपींवर कलम ३२३, ५०४ व ५०६ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. वास्तविक एवढी गंभीर तक्रार असतांना परिस्थीतीनुसार गुन्हे नोंदविले नाही. पिढीत महिला ही अनुसुचित जातीची असून या महिलेला आरोपीने भर चौकात तिचे अंगावरील कपडे सुटेपर्यंत मारहाण करून विनयभंग केलेला आहे. म्हणुन आरोपीवर तातडीने विनयभंग आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा आणि आरोपीला अटक करावी, अशी मागणी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डोहणे, जिल्हा महासचिव सुरेंद्र रायपुरे, प्रशांत रामटेके, राजुरा तालुकाध्यक्ष बंडु देठे, अमर धोंगडे, सूरज उपरे, सुदेश शिंगाडे, बादल ताकसांडे, भीमराव आंबटवार, वैभव ताकसांडे, सुजल सांडे, अंकीत रामटेके, संदीप चंद्रगिरीवार, विक्रांत धोंगडे यांनी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top