Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चुनाळा येथे ३५० रुग्णांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चुनाळा येथे ३५० रुग्णांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ ग्रामपंचायत चुनाळा व एक्सीडेंट व क्रिटिकल केअर हॉस्पिटल बल्लारपूरचा संयुक्त उपक्रम आमचा ...

  • चुनाळा येथे ३५० रुग्णांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ
  • ग्रामपंचायत चुनाळा व एक्सीडेंट व क्रिटिकल केअर हॉस्पिटल बल्लारपूरचा संयुक्त उपक्रम
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
बदलत्या वातावरणामुळे मानवी शरीरात होत असलेल्या बदलामुळे निर्माण होत असलेले आरोग्याचे प्रश्न लक्षात घेता ग्राम पंचायत चुनाळा, एक्सीडेंट व क्रिटिकल केअर हॉस्पिटल बल्लारपूर व जेनेसिस पॅथॉलॉजि लॅब बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन चुनाळा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन दि. १९ डिसेंबर ला करण्यात आले, यावेळी ३५० नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी आरोग्य शिबिराला माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्यापरिस्थितीत वैद्यकीय सेवा अत्यंत महागडी झाली असून सामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचार घेताना कर्जबाजारी व्हावे लागते आहे. शासकीय योजना आहे परंतु काही अटी व शर्तीमुळे सर्वांना याचा लाभ मिळत नसल्याने आरोग्याच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत असताना अक्सीडेंट व क्रिटिकल केअर हॉस्पिटल बल्लारपूर व जेनेसिस पॅथॉलॉजि लॅब बल्लारपूर येथील सेवाभावी डॉक्टरांनी ग्रामीण भागात येऊन रुग्णांना मोफत सेवा देत असल्याबद्दल डॉ. प्रशिक वाघमारे यांचे अभिनंदन केले. यावेळी सरपंच बाळनाथ वडस्कर, डॉ. प्रशिक वाघमारे एम डी (नुरोसर्जन), डॉ. अस्मिता मेश्राम-टिपले एम डी (मेडिसिन), डॉ. नितीन टिपले एम डी (पॅथॉलॉजी), डॉ. रुबीना शेख, डॉ. कविता कलपल्लीवार उपस्थित होते.
या शिबिरात डायबिटीज, हृदयरोग, रक्ततपासणी, जनरल फिजिशन, मेंदू-मणक्याचे विकार व फिजिओथेरपीसह इतर तपासण्या करून रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात आली. यात चुनाळा, बामनवाडा सह परिसरातील नागरिकांनी मोठ्यासंख्येनी लाभ घेतला. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी सह ग्रामपंचायत कर्मचारी अनिल वांढरे, गजानन कार्लेकर, विजय चोथले, पावन संग्रेन, श्रीराम मडावी व इतर कर्मचारी यांनी आरोग्य शिबिराकरिता सहकार्य केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top