धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरपना नगरपंचायतची रणधुमाळी सुरू असून आज २१ डिसेंबर ला मतदान होत आहे. या निवडणूकीत भाजपा, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शिवसेना युती करून शहर परिवर्तन आघाडी विरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस थेट लढत आहे.
भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांची कोरपना नगरपंचायत निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज शहरात मतदान असताना. काल रात्री शहरात काँग्रेस नेते विजय बावणे व नितीन बावणे व इतर कार्यकर्त्यांनी भाजपा जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांच्या गाडीवर दगडफेक करून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनोवृत्तीचे दर्शन कोरपना शहरातील नागरिकांना दिसून आले आहे.
या घटनेच्या विरोधात भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षातर्फे कोरपना पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात
भारतीय दंड संहिता १८६० कलम १४३,१४७, ३२३, ३४१,४४७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. निवडणुकीचे वातावरण शांततापूर्ण राहावे व आदर्श आचारसंहितेचे पालन करत निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी आरोपींना अटक करून कार्यवाही ठरावी अशी मागणी करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.