- विमुक्त जाती, भटक्या जमाती, क्रांतिकारक आहेच नवीन क्रांती करावे - पद्मश्री लक्ष्मण माने
- भव्य संघर्ष यात्रा रॅली चंद्रपुरात
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली महाराष्ट्र-जिल्हा शाखा चंद्रपूर द्वारे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग समाजाचे समस्या संदर्भात महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारकडे प्रलंबित समस्या बाबत शासनाला अवगत करण्याकरिता व सदर विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता संघर्ष वाहिनी नागपूर यांचे नेतृत्वात मागासवर्गीय प्रवर्गातील विविध संघटने चे विद्यमाने पूर्व विदर्भातील सात जिल्ह्यातून भव्य संघर्ष रॅली दिनांक 18 नोव्हेंबर 2021 पासून नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात संघर्ष यात्रा करून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश केली. स्व. मा.सा. कन्नमवार यांच्या स्मृती दिनी त्यांची कर्मभूमी मुल येथे स्मृति दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पदमश्री लक्ष्मण माने, उपराकार प्रसिद्ध साहित्यिक व संघर्ष यात्रेचे प्रमुख दिनानाथ वाघमारे सह विविध सामाजिक कार्यकर्ते भव्य रॅली मुल, पोंभूर्णा, गोंडपिप्री, राजुरा, बल्लारपूर तालुक्यातून रॅली आटोपून बल्लारपूर मार्गे दिनांक 24 नोव्हेंबरला रॅली सायंकाळी 5.00 वाजता चंद्रपूर येते पोहचले, याप्रसंगी मा. सा. कन्नमवार स्मृतदिनानिमित्त आयोजित भव्य रॅली चे स्वागत समारंभ कार्यक्रम 24. नोव्हेंबर 2021 ला सायंकाळी ठीक 6.00 वाजता जतीराम बर्वे सभागृह, एकलव्य मुलांचे वसतिगृह रेंजर कॉलेज समोर मुल रोड चंद्रपूर येथे स्वागत व जनजागृती सभा श्री आनंदराव अंगलवार, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली मान. पद्मश्री लक्ष्मण माने, उपाराकार प्रसिद्ध साहित्यिक यांचे हस्ते उद्घाटन व प्रमुख मार्गदर्शन , मान. दिनानाथ वाघमारे संघर्ष वाहिणी नागपूर, मान. प्रमोद काळबांडे,सहसंपादक सकाळ नागपूर, मुकुंद अडेवार,नागपूर, तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील विविध समाज प्रमुख सर्वश्री.अशोक पवार बिरहाडकार साहित्यिक,,कृष्णाजी नागपुरे ,प्रभाताई चिलके, दिवाकर बावणे, चंद्रशेखर कोटेवार, डॉ. वासुदेव डहाके , भास्कर भोयर, ,डॉ. योगेश दुधपाचारे, रमेश नागपुरे, सौ, रंजना पार्शीवे, सौ, नीताताई नावरखेले इत्यादींचे प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन व उपस्थितीत कायक्रम संपन्न झाले या प्रसंगी उद्घटकीय भाषणातून पद्मश्री लक्ष्मण माने यांनी म्हटले की भारताचे स्वातंत्र्य लढ्यातील सदर समाजाचे उल्लेखनीय भूमिका होती,देशाचे विकासात या समाजाचे महत्त्वाचे भूमिका आहे, स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे लोटले परंतु कोणत्याही सरकारने या जमाती चे विकासासाठी ठोस उपक्रम राबविलेले नाही,सर्वांगीण परिवर्तन घडुन येण्यास स्वतः कर्तबगार समाज स्वयं कष्टाने प्रगती केलेले आहे कोणत्याही सरकार चे भिकेवर हा स्वाभिमान समाज जगलेले नाही व या समाजातील सर्वांनीच विविध व्यसनाधीन प्रवृत्ती व धंद्यापासून दूर राहून आगामी काळात या समाजातील लोकांनी राज्यकर्ते बनन्यासाठी राजकीय क्रांतिकारक बनणे आवश्यक आहे ज्या समाजाने राज्यात तीन मुख्यमंत्री अनेक मंत्री व देशपातळीवर अनेक नेते दिले अशा समाजाकडे विषेश राज्यकिय अधिष्ठान आहे हे युवकांनी व नवीन पिढीने ओळखले पाहिजे असे अनेक उदाहरणासह विस्तृत मार्गदर्शन केले, संघर्ष वाहिनीचे माध्यमातून विविध समस्या शासन दरबारी मांडताना समाजाने सर्वांगीण मदत करून सामाजिक चळवळ निरंतर चालुठेवावे व या कार्यात युवकांनी स्वताला झोकून द्यावे असे आवाहन केले ,समाज संघटित राहून संघर्ष केल्याने समाजाचे समस्या सुटतात असे मान, अशोक पवार बिऱ्हाडकार यांनी प्रतीपादित केले , उमेश कुर्राम यांनी युवकाकरिता विविध शैक्षणीक योजनांचे माहिती दिले.या प्रसंगी श्री, आनंदराव अंगलवार, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष यांनीआपले अध्यक्षीय भाषणात म्हणाले की समाजाने शिक्षणाचा कास धरावे व काळानुसार बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन आपले उपजीविकेचे संसाधने बदलवून आपले भावी पिढीला आर्थिक स्तर्य देण्यासाठी जुने व नविन व्यावसायिक संकल्पनांचे ळ घालून नवीन आर्थिक विकासातामक नियोजन व पद्दती आत्मसात करून त्यानुसार कार्य करावे व त्या करिता संघटित राहून शासनदरबारी धडक दिल्याने काही प्रमाणात समस्या सुटू शकतात व त्याकरिता कायद्याचे चाकोरीत राहून जे करावे लागणार ते करण्यास तत्पर राहावे असे मत व्यक्त केले याप्रसंगी विमुक्त, भटक्या,मागास प्रवर्गातील समाज बंधुभगिनी बहुसंख्येने उपस्थित होते ,कार्यक्रमाचे संचलन विजय पोहनकर व प्रास्ताविक प्रा. योगेश दूधपचारे तर सौ, रंजना पार यांनी आभार मानले, कार्यक्रम यशस्वितेसाठी सुभाष हजारे, रतन शिलावार, पंडित राठोड, कैलाश कार्लेकर उमेश वाघाडे व इतर युवक युवती परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.