Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वीज दिव्यांच्या रोषणाईने नागपूर रोडवर झगमगाट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण चंद्रपूर - दिवाळीच्या शुभ पर्वावर धनत्रयोदशीच्या दिवशीपासून नागपूर रोडवरील प्रियदर्शिनी इंदिरा...
  • आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण

चंद्रपूर -
दिवाळीच्या शुभ पर्वावर धनत्रयोदशीच्या दिवशीपासून नागपूर रोडवरील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक ते नागपूर रोडवरील आय लव्ह चंद्रपूरपर्यंत दुभाजकावरील पथदिव्यांच्या खांबांना वीज दिव्यांची रोषणाई लावण्यात आली असून, रात्रीच्या वेळी झगमगाटात सुरू झाला आहे.
वीज दिव्यांच्या रोषणाईचा लोकार्पण सोहळा २ नोव्हेंबर २०२१ रोजी आमदार तथा लोकलेखा समिती अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्विच ऑन करून झाले. संजय गांधी मार्केट, नागपूर रोड येथे आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महापौर राखी संजय कंचर्लावार होत्या. कार्यक्रमाला उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष ङाॅ. मंगेश गुलवाङे, सभागृह नेता देवानंद वाढई यांची उपस्थिती होती.









































About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top