Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दीपावली सण आहे दीपोत्सवाचा, अंगणी दिवा लावूया मातीच्या पणतीचा..!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दिवाळी संस्कृतीचाच एक भाग.....! एक दिवा त्यांच्या साठी....  संपादकीय  दिवाळी म्हटले की, आठवतो फराळ, फटाके, नवीन कपडे. हा आनंदाचा, दीपोत्सवाच...
  • दिवाळी संस्कृतीचाच एक भाग.....!
  • एक दिवा त्यांच्या साठी.... 
  • संपादकीय 
दिवाळी म्हटले की, आठवतो फराळ, फटाके, नवीन कपडे. हा आनंदाचा, दीपोत्सवाचा सण. हा सण आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे. दिवाळी सर्वांसाठी आहे. त्याचा आनंद सर्वजण घेऊ शकतो. अनेकांसाठी काही कारणांसाठी दिवाळी खास ठरते, दिवाळी सामाजिक आणि सांस्कृतिकचाच एक भाग. 
दीपावली म्हणजे दीपोत्सव, दिव्याचा संबंध ज्योतीशी, आणि त्याचा संबध ज्ञानाशी जोडल्या जातो. ज्ञानाची वृद्धी करणे. त्याची वाढ कशी होईल हे पाहणे हा एक संकल्प होऊ शकतो. दिवाळीत ज्या अनावश्यक गोष्टी आहेत, जशाकी फटाके आदी, या गोष्टी टाळून आपण सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने काही गोष्टी करू शकतो का, याचा विचार केला, तर दिवाळी अधिक आनंदमयी होईल. आज दिवाळीचे स्वरूप बदलत चालले आहे. अगोदर सणाला खूप-खूप महत्त्व होते. नवीन कपडे, दिव्यांची आरास, फराळ हे वर्षाला एकदाच ठरलेले असे. फराळ-मिळाई, कपडे हे असे बालपणीच चित्र होते. आता या गोष्टी रोजच उपलब्ध होतात. यामुळे ‌चित्र बदलेले दिसते. असे असले, तरी सणाचा उत्साह कमी झालेला नाही. अनेकांचे नवनवीन संकल्प असतात. परेदशातही दिवाळीला महत्त्व आहे.
भारताचे एक प्रतीक म्हणून, उत्साहाचा सण म्हणून या सणाकडे पाहिले जाते. फक्त यात अनावश्यक गोष्टी टाळून ज्ञान, मनोरंजन, सामाजिक अभिसरण, भेटगाठी या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या, तर ते अधिक आनंददायी ठरू शकते. अशाच दृष्टीकोनातून दिवाळी साजरी करण्याचा मानस आपण सर्वानी मानस करूया. 

एक दिवा त्यांच्या साठी.... 
दीपोत्सवाच्या या सणात या आपण एक दिवा संकटात असलेल्यांसाठी, एक दिवा आजारग्रस्तांसाठी, एक दिवा अक्षर ओळख नसलेल्यांसाठी, एक दिवा आधार नसलेल्यांसाठी, एक दिवा देशाकरिता आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांसाठी आणि एक दिवा कोरोना ने जे आपले विश्वबांधव गेले त्यांच्या साठीही लावूया. खूप नाही पण निदान जितकी आपल्याने करता येईल, तेवढी मदत जरी आपण गरीबाला केली तरी त्यांच्याही आयुष्यात आपल्याला आनंद आणता येईल. प्रत्येक मदत ही पैशातच करायला हवी, असं मुळीच नाही. जे आपण देऊ शकू इतरांसाठी ते देऊ. कधी आपला थोडासा वेळ, कधी त्यांच्यासाठी केलेले जमेल तेवढे शारीरिक कष्ट, कधी मनमोकळं बोलणं, कधी शाब्दिक आधार, तर कधी सुंदर साधलेला संवाद, कधी अन्नदान ! ज्या स्वरूपात आपल्याला मदत करता येईल तेवढी करावी.
दिवाळी माझी, दिवाळी तुझी, दिवाळी आपल्या सर्वांची लाडकी होऊन जावो. सर्व घरा घरांत आनंद देऊन जावो. अशा या सुंदर दीपावलीच्या आमचा विदर्भ परिवाराकडून सर्वांना मनापासून शुभेच्छा. 






































Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top