- श्री लक्ष्मी नृसिंह सहकारी व श्री संत गाडगेबाबा वाचनालय संस्थेचा स्तुत्य उपक्रम
बल्लारपूर -
पोटाची खडगी भरण्यासाठी त्या कचऱ्यातून वस्तू गोळा करतात, तासन तास कचरात घालविल्यानंतरच त्यांचे कुटूंब चालते उदरनिर्वाहसाठी आरोग्यच संकटात टाकणाऱ्या या मुलां व महिलांचा दीपोत्सव सर्व सारखा साजरा करण्याकरीता श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था व श्री संत गाडगे बाबा महाराज सार्वजनिक वाचनालयच्या वतीने स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कचरा वेचणाऱ्या मुलां, मुलींनीकडून देवी लक्ष्मीजीच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन पूजा-अर्चना करण्यात आले.
दीपोत्सव निमित्य घरोघरी आनंदाचे वातावरण आहे. सर्वत्र रोषणाई पणत्यांची आरास, घरासमोर काढलेल्या सुंदर रांगोळया, नवीन कपडे आणि गोडधोड पदार्थाची रेलचेल आहे. पण समाजतील एक वर्ग असाही आहे ज्यांना या सणाचा आनंद दुसऱ्यांकडे पाहूनच घ्यावा लागतो मात्र श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्थेच्या पुढाकारने हे अंतरच मिटविण्यात आले.
दिवस उगवला की हातात थैली घेऊन त्यांचा दिनक्रमाची सुरुवात होते. वार्डावार्डात व गल्लोगल्ली असलेल्या उकिरड्याला उकरायचे व त्यातून काही वस्तू गोळा करायच्या दिवसभर सतत भटकंती करायची अन मिळालेल्या दीड दमडीवर आपली गुजरान करायची, शिक्षण, शाळा, शिक्षक काय असते ते त्यांना माहीतच नाही यातून काय बदल होतो याची त्यांना जाण नाही, असे शैकडो मुले मुली आज शहरात कचरा वेचण्याचे काम करीत असतांना दिसून येतात. या चिमुकल्यांना दिवाळी आनंद मिळावा त्यांच्या सुखदुख बाबत माहिती घ्यावी या उदात्त उद्देश्याने श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी एवं संत गाडगेबाबा महाराज सार्वजनिक वाचनालयाने पुढाकार घेतला. या प्रसंगी सर्व मुलांची खुशी देखण्यासारीखी होती, पूर्ण वातावरण आनंदमय वाटत होता. सर्व मुलांना, मुलीनां व महिलांना गोड पदार्थ फराळ देण्यात आले, सर्वासोबत पटाखे फोडून दिवाळीच्या सण उत्साहाने साजरा केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक उमेश पाटिल होते, मुलांना उपदेश देवून चांगला नागरिक बनवून देश आणि आपल्या आई वडिलांचे नाव रोशन करावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी विकास राजुरकर, श्रीनिवास सुंचूवार, देवा वाटकर, विनायक साळवे, रामेश्वर पासवान, सतीश शेंडे, गणेश सैदाने, किशोर ईटनकर, वर्षा सुंचूवार, अरूणा राजुरकर, संजय कोलशेट्टी, भूषण सूंचूवार, श्रध्दा शेंडे, देविका राजुरकर, कुलदीप सुंचूवार, मानव पापमपट्टीवार, ज्ञानेश्वर उद्रेके, पुलिस कर्मी रवि चेरपुरवार पुलिस विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.