- आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
- नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १३ कोटी, २७ लाख ५७ हजार रुपयांची मदत
राजुरा -
राजुरा मतदार संघात विकास कामे, प्रत्येक नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार सुभाष धोटे सातत्याने प्रयत्नशील आहेत. जुलै २०२१ रोजी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, गोंडपिपरी, कोरपना आणि जिवती तालुक्यातील जनावरे पुरात वाहून गेल्याने, विज पडुन मरण पावल्याने, मृत्यू ओढवल्याने, शेतपिकांचे नुकसान झाले व जमीन खरवडून गेली. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले. याबाबीची दखल घेत राजुरा विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार सुभाष धोटे यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून १३ कोटी २७ लक्ष, ५७ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे. आज राजुरा तालुक्यातील नुकसानग्रस्तांना तहसील कार्यालय राजुरा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले.
यात राजुरा येथील ३६ लाभार्थ्यांना एकुण १५ लाख ५६ हजार रुपयांचे धनादेश आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तर राजुरा येथील पिकांचे नुकसान झालेल्या ६,०५५ लाभार्थ्यांना २ कोटी ५२ लाख रुपये, नदी पट्ट्यातील जमिन खरवळून गेलेले अंदाजे ७६ खेड्यातील लाभार्थ्यांना ५ कोटी ५२ लाख रुपये, गोंडपिपरी येथील ४५ लाभार्थ्यांना ५ लाख ५७ हजार रुपये तर पिकांचे नुकसान झालेल्यांना ८६० लाभार्थ्यांना ४३ लाख ४, ५९० रुपये, कोरपना येथील शेत पिकांचे २, ७२२ लाभार्थ्यांना १ कोटी १ लाख रुपये आणि जिवती येथील १३ लाभार्थ्यांना १४ लाख ४० हजार रुपये तर शेत पिकांचे नुकसान झालेल्या ८, ५२४ शेतकऱ्यांना ३ कोटी ४४ लाख रुपये आर्थिक मदत करण्यात येत आहे. तर सन २०१९ मधील तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या २,१६६ मजुरांना २९ लाख ८१ हजार रुपयांची आर्थिक मदत प्रत्येकांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना आमदार धोटे यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.