- समाज एकसुत्र ठेवण्यासाठी स्वत:चे नेतृत्व तयार करा - बापुराव मडावी
- टेंबुरवाही येथे क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके समाज भवन लोकार्पण व समाज प्रबोधन सोहळा संपन्न
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा -
समाज त्यांनाच स्विकारतो जे समाजाचे नेतृत्व करण्यास सज्ज असतात. लाचारी चे जिवन तर भिक मागुनही जगता येते. जिवन जगायचे असेल तर ध्येय निश्चित करून वाचा सारखे जगा. पेनवासी उध्दवराव कुळसंगे यांनी आपल्या जिवनात तत्त्वांशी कधीच तडजोड केली नाही व शेळी सारखे जगले ही नाही. त्यांची प्रेरणा आजच्या नव्या पिढीने घेऊन स्वत:चे सामाजिक नेतृत्व तयार करायला शिकले पाहिजे हिच क्रांतीवीरांना खरी आदरांजली ठरेल. असे मौलिक मार्गदर्शन गोंडवाना गणतंत्र पार्टी चे जिल्हा अध्यक्ष बापुराव मडावी यांनी महानायक बिरसामुंडा जयंतीनिमित्त टेंबुरवाही येथील समाज प्रबोधन मेळावा व समाज भवनाच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी केले.
राजुरा क्षेत्राचे तत्कालीन आमदार अॅड. संजयभाऊ धोटे यांनी सन २०१७-१८ च्या आमदार निधीतून १२.०० लक्ष रूपये खर्चून बांधलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके समाज भवनाच्या लोकार्पण सोहळा व समाज प्रबोधन कार्यक्रम आदिवासी गोंड समाज मंडळ चर्या वतीने (१५ नोव्हेंबर) आयोजित केला होता. गोंडवाना गणतंत्र पार्टी चे युवा प्रदेश कार्याध्यक्ष गजानन गोदरू पाटिल जुमनाके, प्रदेश महासचिव अब्दुल जमीर अ.हमीद, पं.स.राजुरा उपसभापती मंगेश गुरनुले, माजी जिप सदस्य भिमराव पाटील मडावी यांनी मेळाव्यात मनोगत व्यक्त केले.
मंचावर राजुरा पंस सभापती मुमताज जावेद, माजी सरपंच रत्नमाला गेडाम, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन अलगमकर, अब्दुल जावेद, गुणवंतराव कुळसंगे, ममता जाधव, अरूण उदे, पोलिस पाटील विनोद खनके, आडकु पाटील गेडाम, प्रभाकर उईके, मनोहर रणदिवे, प्रतिष्ठित नागरिक दशरथ चापले, हनमंतू कुमरे, नत्थु धोंगडे, मुख्याध्यापक बोंडे सर, महादेव रावजी कुळसंगे, बळवंत गेडाम उपस्थित होते.
प्रास्ताविक रोहन गेडाम, संचालक चव्हाण व तिरूमाय धनश्री कुळमेथे यांनी केले. आभार संतोष कुळसंगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मंगेश इस्टाम, संतोष कुळसंगे, बंडू कुळसंगे, पांडुरंग सिडाम, संभुजी गेडाम, जलपती कोडापे, मनोहर गेडाम, रमेश मडावी, शंकर सिडाम, मंगेश कोटनाके, रविंद्र कुळसंगे, सुरज वेटी, अरविंद कोटनाके, मंगला मेश्राम, कुसुम गेडाम, माया कोटनाके, चंद्रकला गेडाम, शकुंतला सिडाम, शालू गेडाम, साक्षी कुळसंगे यांनी परीश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.