Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू यांनी केली ताडोबा सफारीची सैर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू यांनी केली ताडोबा सफारीची सैर  रूद्रा वाघ व छोटी राणीसह इतर वन्यजीवांचे झाले दर्शन आमचा विदर्भ...








  • अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू यांनी केली ताडोबा सफारीची सैर 
  • रूद्रा वाघ व छोटी राणीसह इतर वन्यजीवांचे झाले दर्शन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपुर -
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी ओळखला जातो. ताडोबातील भ्रमंतीसाठी देशातील क्रिकेटपटू, उद्योगपती, चित्रपट अभिनेते, अभिनेत्री आणि राजकीय नेते ताडोबात पोहोचतात आणि जंगल सफारीचा हरवलेला आनंद लुटतात. सोमवारी दुपारी चित्रपट अभिनेते कुणाल खेमू आणि चित्रपट अभिनेत्री सोहा अली खान भ्रमंतीसाठी चंद्रपूरच्या ताडोबाला पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी इनाया नौमी खेमूही होती. कुणाल खेमू आणि सोहा अली खान सोमवारी दुपारी नागपूर चिमूर कोलारा गेटमार्गे ताडोबात दाखल झाले. त्यांनी विश्रांतीसाठी बांबु रेसार्ट बुक केले होते.
विश्रांतीनंतर सोमवारी सायंकाळी त्यांनी कोलारा बफर परिसरात भ्रमंती केली. तिथे त्यांना रुद्रा वाघाचे दर्शन झाले. मंगळवारी सकाळी शिरकाडा बफर परिसरात केलेल्या भ्रमंतीत त्यांना छोटी राणीने दिसली. भ्रमंतीदरम्यान वाघाच्या पायाचे ठसे, सांबर, चितळ, अस्वल त्यांना दिसले. वाघ आणि वाघिणीचे दर्शन पाहून कुणाल खेमू, सोहा अली खान आणि त्यांची मुलगी इनाया नौमी खेमू आनंदित झाले होते. यावेळी त्यांनी अनेक वन्यप्राण्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. भ्रमंतीदरम्यान मार्गदर्शक म्हणून राजू अलोणे यांनी त्यांना वन्यजीवांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत बांबु रेसार्टचे संचालक सुदीप मेहता, व्यवस्थापक अक्षय हेही उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top