Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळीचे नेते राम नेवले यांचे निधन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळीचे नेते राम नेवले यांचे निधन  पृथक विदर्भ मिळवून देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली - अँड वामनराव चटप आमचा विदर्भ -...








  • स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळीचे नेते राम नेवले यांचे निधन 
  • पृथक विदर्भ मिळवून देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली - अँड वामनराव चटप
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागपूर -
विदर्भ राज्य आंदोलन समिती चे मुख्य संयोजक व नुकत्याच स्थापन केलेल्या जय विदर्भ पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष राम नेवले यांचे मंगळवार १६ रोजी मध्यरात्री हृदयविकाराने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. ८ आॅक्टोबर १९५१ मध्ये नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक विवाहित मुलगी असा आप्त परिवार आहे.
राम नेवले हे मूळचे नागपूर जिल्ह्यातील नरखेडचे होते. तिथे त्यांचे कृषी सेवा केंद्र होते. १९८४ मध्ये ते शेतकरी संघटनेच्या संपर्कात आले. नागपूर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे बिनीचे शिलेदार होते. शेतकरी संघटनेच्या विविध आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले. शेतकरी संघटने सोबतच त्यांनी वेगळ्या विदर्भासाठी झोकून दिले. वेगळ्या विदर्भासाठी त्यांनी शेवटपर्यत लढा दिला. नुकतीच त्यांनी महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढवण्यासाठी जय विदर्भ पार्टीची स्थापना केली होती. त्यांनी हिवाळी अधिवेशनात विदर्भ राज्य मिळवूच, असे त्यांनी रणशिंग देखील फुकले होते. "तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे,' यासाठी शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्त्यांनी सरकारने लावलेली बंदी झुगारन एचटीबीटी बियाण्याची लागवड त्यांनी केली होती.

स्वतंत्र विदर्भ हीच श्रद्धांजली - ॲड.चटप 
शेतकरी आणि स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळीकरिता खांद्याला खांदा लावून लढा देणारा खंबीर कार्यकर्ता आता आमच्यात नाही. पृथक विदर्भ मिळवून देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी शोक संवेदना विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अँड. वामनराव चटप यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top