आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा शहरातून गेल्या दोन महिन्यात तीन मोटरसायकल चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणाचा राजुरा पोलिसांनी तपास करून एका चोरट्याला 75 हजार रूपये किंमतीच्या तीन मोटरसायकलसह अटक केली आहे. राजुरा व परिसरातून मागील दोन महिन्यात मोटरसायकल क्रमांक एमएच 34\वाय 3295, किंमत रुपये 15000, स्प्लेंडर प्लस क्रमांक एमएच 34\एझेड 3210 किंमत 20,000 रुपये, मोटरसायकल होंडा शाईन क्रमांक एमएच 34\बीसी 6006 किंमत 40,000 रुपये अशा एकूण तीन मोटरसायकल चोरीला गेल्या होत्या. या मोटरसायकलचा आणि अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना गुप्त माहितीवरुन तीन मोटरसायकली व अज्ञात आरोपीचा राजुरा पोलिसांनी शोध लावला. आरोपी शेख अब्दुल शेख गफार (35) रा.सोमनाथपूर वॉर्ड, राजुरा याला अटक करण्यात आली आहे. राजुरा उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात व पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दरेकर, पोलिस हवालदार खुशाल टेकाम, नक्कावार,तुमराम, संदीप बुरडकर, रामराव बिंगेवड, योगेश पिदूरकर यांनी तपास केला आणि आरोपीला मोटरसायकलसह अटक केली आहे, अशी माहिती राजुरा पोलिसांनी दिली.
प्रकरणाचा तपास व पंचनामा संशयास्पद
राजुरा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषन शाखेतर्फे ही जप्तीची आणि आरोपीच्या अटकेची कारवाई संशयास्पद ठरली आहे. मात्र सायंकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी आणि सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेगळीच माहिती दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या समोर दोन दुचाकी वाहन खासगी वाहनाने झुडपात टाकून देण्यात आले आणि काही वेळात राजरा पोलिस ठाण्यातील पोलिसांनी येथे येवून पंचनामा केला व वाहन जप्त केले. विशेष म्हणजे ज्या चारचाकी मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून हे दुचाकी वाहन आणण्यात आले, त्याच मालवाहतक वाहनाने काहीच मिनिटात ते दुचाकी वाहन जप्त करून नेण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.