Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दरोडा प्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी ; अल्पवयीनाची बालसुधारगृहात रवानगी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दरोडा प्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी अल्पवयीनाची बालसुधारगृहात रवानगी शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी  चंद्रपूर - अरविंदनगर येथील कोळसा,...





दरोडा प्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी
अल्पवयीनाची बालसुधारगृहात रवानगी
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
चंद्रपूर -
अरविंदनगर येथील कोळसा, तंबाखू आणि अंडे व्यावसायिक आरीफ कोळसावाला यांच्या घरी भरदिवसा पावणे दोन कोटीच्या दरोड्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह चार जणांना अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली तर अन्य तीन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तंबाखूचे ठोक व्यापारी असलेले आरिफ कोळसावाला हे अरविंद नगरमधील खनके वाडीमध्ये राहतात. मागील सात दिवसांपूर्वी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान बुरखाधारी तीन युवक त्यांच्या घरात घुसले. तेव्हा घरात तीन महिला होत्या. त्यांनी महिलांना पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून पैसे आणि सोन्याचे दागिने हिसकावून घेत घटनास्थळावरून पोबारा केला. अवघ्या दहा मिनिटांत हा दरोडा घातला होता. याप्रकरणी अटकेतील इमरान इमाम शेख,शहाबाज जबीउल्ला बेग आणि शुभम उर्फ मायाभाई नामदेव दाचेवार या तीन आरोपींना 22 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top