विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा येथील किसान वार्डात राहणारे नानाजी डाखरे यांचे सुपुत्र अनिरुद्ध नानाजी डाखरे यांनी वैद्यकिय शिक्षणासाठी देशपातळीवर होणाऱ्या नीट परीक्षेत देशातून ३८ वा येण्याचा मान पटकावला आहे. त्याला नीट परीक्षेत ७२० पैकी ७१० गुण मिळालेले आहे. अनिरुद्ध लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचा असून त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालय तळोधी बाळापूर येथून घेतले आहे. अकरावी, बारावी सोबतच नीटचे क्लासेस नांदेड येथे केलेले आहेत. आपल्या कुशाग्र बुद्धी व मेहनतीच्या बळावर हे उत्तुंग यश त्याने मिळविले आहे. विशेष म्हणजे त्याच्या मोठ्या बहिणी वैष्णवी आणि अक्षता ह्या मुंबई येथे वैद्यकिय शिक्षण घेत असून एम.बी.बी.एस.,एम.डी. (path.) व दुसरी एम.बी.बी.एस. अंतिम वर्षाला आहे. अनिरुद्धने आपल्या आईवडीलांसोबतच राजुराचे नाव राज्यातच नव्हे तर देशात प्रसिद्ध केले आहे. मराठा सेवा संघ व जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय राजुराच्या वतीने अनिरुद्धचा त्याच्या राहत्या घरी आईवडीलांसोबत पुष्पगुच्छ, चक्रवर्ती सम्राट महात्मा बळीराजा यांची प्रतिमा व मी ओबीसी बोलतो हे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश पारखी, ज.तु. सार्वजनीक वाचनालय राजुराचे अध्यक्ष प्रा. दत्तात्रय मोरे, मधुकर डांगे, मधुकर मटाले, संभाजी साळवे व दुष्यंत निमकर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.