Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोयला श्रमिक सभा बल्लारपूर विभागाच्या कार्याध्यक्षपदी बबन उरकुडे यांची निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राष्ट्रीय कार्यकारणी समिती नागपूरचे अध्यक्ष शिवकुमार यादव यांच्या मार्गदर्शनात नियुक्ती आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - राजुरा विधान...
















































  • राष्ट्रीय कार्यकारणी समिती नागपूरचे अध्यक्ष शिवकुमार यादव यांच्या मार्गदर्शनात नियुक्ती
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा विधानसभा शिवसेनेचे युवानेतृत्व बबन नारायण उरकुडे यांची कोयला श्रमिक सभा संलग्न हिंद मजदूर सभेच्या बल्लारपूर विभागाच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
को.श्र.स.चे राष्ट्रीय कार्यकारणी समिती नागपूरचे अध्यक्ष शिवकुमार यादव मार्गदर्शनात तर जेनरल सेक्रेटरी फ्रांसिस दारा व ट्रेजरर दीपक जयस्वाल यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली. बबन उरकुडे गेल्या 15 वर्षांपासून राजुरा तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य अतिशय मोलाचे असून, बल्लारपूर विभागातील प्रकल्पधारकांसाठी ते नेहमी रस्त्यावर उतरून लढाई लढत आहे.
वेकोली कर्मचारी, तंटामुक्ती अध्यक्ष, शिवसेनेचे तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आता विधानसभा समन्वयक म्हणून ते राजकीय क्षेत्रात काम करत आहे याच अनुषंगाने कोयला क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील एका मोठ्या कामगार संघटनेच्या विभागीय कार्याध्यक्ष पदी झालेली ही नियुक्ती कोयला क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाची ठरेल असे चित्र आहे. प्रकल्पग्रस्त शेतकरी कामगार आणि परिसरातील सर्व समस्यांसाठी लढत राहील असे मनोगत बबन उरकुडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी राजुरा तालुका शिवसेनेचे समन्वक प्रदीप येनूरकर, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, उपतालुका प्रमुख रमेश झाडे आदी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top