Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्पर्धा परीक्षा अभ्यासक विद्यार्थ्यांना पुस्तके ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप तथा  अनाथ आश्रमातील मुलांना स्वेटर वाटप जिप कृषी व प...
















































  • स्पर्धा परीक्षा अभ्यासक विद्यार्थ्यांना पुस्तके
  • ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप तथा 
  • अनाथ आश्रमातील मुलांना स्वेटर वाटप
  • जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकूडे व नगरसेवक राजू डोहे तथा भाजपा राजुरा तालुका व शहर यांचा पुढाकार
विरेंद्र पुणेकर- आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज भय्या अहिर यांच्या वाढदिसानिमित्त भाजपा राजुरा तालुक्याच्या वतीने विविध सेवा उपक्रम राबविण्यात आले.
प्रथम भाजपा कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या हस्ते केक कापून भैय्यांना दीर्घायुष्य लाभावे याकरीता प्रार्थना करण्यात आली तसेच ग्रामीण भागातील वाचनालया करीता नगरसेवक राजू डोहे यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तकांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर भाजपा राजुरा तालुका व शहर वतीने ग्रामीण रुग्णालय राजुरा रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. नंतर चुनाळा येथील अनाथ आश्रम मुलांना जिप चे कृषी व पशसंवर्धन सभापती तथा भाजपा तालुका अध्यक्ष सुनील उरकुडे यांच्या माध्यमातून स्वेटर चे वाटप करण्यात आले.
या संपूर्ण सेवादिनी प्रामुख्याने माजी आमदार अँड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकूडे, नगरसेवक राजू डोहे, तालुका महामंत्री प्रशांत घरोटे, दिलीप वांढरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, मधुकर नरड, वाघुजी गेडाम, भाजपा युवामोर्चाचे उपाध्यक्ष सचिन डोहे, दिलीप गिरसावळे, मिलिंद देशकर, गणेश रेकलवार, सचिन शेंडे संदीप पारखी, विलास खिरटकर, दीपक झाडे, महादेव तपासे, सचिन सिंह भैस, शिणू पांजा, सुनील लेखराजनी, कैलाश कार्लेकर, अजय बांदुरकर, आकाश गधारे, प्रदीप मोरे, योगेश येरणे, राजकुमार भोगावार, श्रीनिवास कोपुला, कृष्णा कुंभाला, राजकुमार निषाद इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top