राजुरा -
राजुरा तालुक्यात मौजा आर्वी येथे दुपारी १२ वाजता तहसीलदार राजुरा यांच्या पत्रानुसार पोलीस निरीक्षक राजुरा, पोलीस विभागाचे कर्मचारी, ग्राप आर्वीचे सरपंच, उपसरपंच, अहेरी चे कोतवाल अर्जदार, गैरअर्जदार यांच्या उपस्थितीत मागील २० वर्षांपासून वहिवाटीसाठी बंद असलेला सरकारी रस्ता मोकळा करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजा आर्वी ते खैरगाव रिट कडे जाणारा सरकारी रस्ता मौजा आर्वी येथील गैरअर्जदार लटारू कान्हु जावडेकर यांची मुलगी प्रेमिला आनंदराव तावाडे यांनी सिमेंट पोल गाडून तारेचे कंपाऊंड बांधून कायमचे बंद केला होता. मा. तहसीलदार यांच्या पत्रानुसार सदर सरकारी रस्ता अर्जदार शेतकऱ्यांना वहीवाटी करीता मोकळा करण्याची कार्यवाही पोलीस बंदोबस्तात आज करण्यात आली.
सदर रस्ता मोकळा करण्यासंदर्भात मा. तहसीलदार यांचे नोटीस अर्जदार व गैरअर्जदार यांना दि. २८ /१०/२०२१ रोजी देण्यात आले होते. मात्र गैरअर्जदार यांनी स्वतःहून स्वखर्चाने अतिक्रमित रस्ता मोकळा केला नाही शेवटी आज दि. ११ नोव्हेंबर रोजी मा तहसिलदार राजुरा यांचे पत्रानुसार पोलीस बंदोबस्तात रस्ता JCB च्या सहाय्याने वहीवाटी करीता मोकळा करण्यात आला.
या प्रसंगी आर्वी ग्रामपंचायतचे सरपंच शालूताई लांडे, उपसरपंच भाष्कर डोंगे, सुभाष कालवले, पोलीस पाटील सेलुरकर, विनोद चिंचोलकर यासह अनेकांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.