Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: धोपटाला ग्रापं कार्यालय जवळ दुचाकी आणि मोटारसायकलची धडक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धोपटाला ग्रापं कार्यालय जवळ दुचाकी आणि मोटारसायकलची धडक महिलेसह दोघांना किरकोळ दुखापत विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - धोपटा...












  • धोपटाला ग्रापं कार्यालय जवळ दुचाकी आणि मोटारसायकलची धडक
  • महिलेसह दोघांना किरकोळ दुखापत
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
धोपटाळा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ राजुरा सास्ती मार्गावर खोल खड्डे पडल्याने गुरुवारी दुपारी १२ वाजता मोटारसायकल आणि मोपेडची धडक झाली. या घटनेत एका महिलेसह दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही मोठी घटना घडली नाही. राजुरा-कवठाळा मार्गावर दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू नुकताच झाला होता. तालुक्यात पुन्हा एका घटनेत एक मुलगा आईला बाईकवर घेऊन तेलंगणाला जात असताना अचानक खड्ड्यात पडल्याने त्याचा आईचा मृत्यू झाला होता. असे असतानाही रस्त्यावरील खड्यांची डागडुजी कडे संबंधित विभाग लक्ष देत नसल्याने नागरिकांत रोष निर्माण होत आहे. 
या मार्गावर खोल खड्डे पडल्याने नुकतीच एक महिला शिक्षिका सास्ती कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ दुचाकीवरून पडली. आता तर रस्त्याकडे पाहून रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत हे सांगणे कठीण होत आहे. या मार्गावरून वेकोलिमध्ये कार्यरत शेकडो कामगार, कर्मचारी, अधिकारी, व्यापारी, शाळा महाविद्यालयातील मुले-मुली व कोळसा भरलेले ट्रक, दुचाकी व चारचाकी वाहनांची ये-जा सुरू असते. धोपटाळा ग्रामपंचायत कार्यालयातील सदस्यही या मार्गावरून जातात. अनेक महिन्यांपासून या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे छोटे-मोठे अपघात होतच असतात. 
18 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास राजुराहून सास्तीकडे जाणारा मोटारसायकलस्वार त्या खड्ड्यात पडला. सुदैवाने त्यावेळी एकही जड वाहन मागून येत नसल्यामुळे मोठा अपघात होता होता वाचला अन्यथा मोठी घटना घडू शकली असती. गुरुवारच्या घटनेत महिलेसह दोघांनाही किरकोळ दुखापत झाली होती, मात्र दुखापत झालेल्यांची नांवे व वाहन क्रमांक मात्र मिळू शकले नाही.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top