Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर खासगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवाशी वाहतूक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर खासगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवाशी वाहतूक एसटी बंदचा गैरफायदा ; काही मार्गावर अधिक भाडे वसुलीही आमच...











  • वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर खासगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवाशी वाहतूक
  • एसटी बंदचा गैरफायदा ; काही मार्गावर अधिक भाडे वसुलीही
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी 28 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. सर्वसामान्यांचा बसची चाके थांबलेली असतांना याचा गैरफायदा खासगी वाहने नियम डावलून क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी बसवून व काही मार्गावर अधिक भाडे वसुल करून घेत आहेत.
चंद्रपूर ते बल्लारपूर आणि बल्लारपूर ते राजुरा अशी ऑटो धावत आहेत. डिझेलवर चालणाऱ्या छोट्या ऑटोनां चालकासह 4 आणि मोठ्या ऑटोनां 7 प्रवाशी बसवण्याची परवानगी आहे. मात्र 7 सीटर ऑटोमध्ये 15-15 प्रवासी बसवून जास्त फेरी मारण्याचा नादात भरधाव वेगाने अत्यंत वेगाने ऑटो धावत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहनांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेगवेगळ्या शहरात वाहतूक पोलिसांसमोर, अशा प्रकारे नियमांपेक्षा अधिक क्षमतेने ऑटो प्रवासी वाहतूक करीत आहेत परंतु कारवाई होत नाही. काही वर्षांपूर्वी विसापूरजवळ रात्रीच्या वेळी ओव्हरलोड ऑटोच्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून रात्रीच्या वेळी ऑटोमध्ये जाण्यास लोक टाळाटाळ करत होते. मात्र सध्या एसटी संपाचा फायदा घेत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहने भरधाव वेगाने धावत आहेत.
खासगी बसेसही ओव्हरलोड
लांब पल्ल्याच्या खासगी बसवाले ही ओव्हरलोड वाहने चालवत आहेत. 34 सीटर मिनीबसमध्ये दुप्पट प्रवाशी बसवले जात असल्याने कधी यामुळे अपघात झाल्यास अनेकांचा गुदमरून बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर प्रकाराकडे वाहतूक विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top