आमचा विदर्भ - ब्यूरो रिपोर्ट्स
चंद्रपुर -
"लोग टूट जाते हैं एक घर बनाने में....
तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में....."
प्रसिद्ध कवी बशीर बद्रजी यांची ही कविता दि. १५ नोव्हेंबर रोजी खरी ठरली जेव्हा चंद्रपुरातील महाकाली मंदिर दानववाडी जवळील दिव्यांग जोडपे आपल्या तीनचाकी सायकलवर अगरबत्ती-धूपबत्ती व पूजेचे साहित्य विकून आपल्या पोटाची खडगी भरत होते. मात्र दि. १५ नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्री काही अज्ञात समाजकंटकांनी भास्कर सातपुते यांची तीनचाकी जाळून टाकली.
अज्ञात समाजकंटकांनी तीनचाकी सायकल जाळल्याने भास्कर सातपुते नामक दिव्यांग जोडप्यासमोर आता पूजेचे साहित्य कसे विकायचे व पोटाची खडगी कशी भरायची असा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र या देशात 'दिव्यांनी दिवे' तेवत ठेवणारे लोकही आहेत जे तळागाळातील लोकांना वेळेप्रसंगी माणुसकीचा हात देतात आणि भास्करचा मदतीला अशीच माणुसकी धावून आली.
दिव्यांगांची तीनचाकी जळाल्याबद्दल प्रसारमाध्यमात बातम्या प्रकाशित झाल्या. या बातम्या वाचून चंद्रपुरातील जलसंपदा विभागात कार्यरत वरिष्ठ लिपिक गणेश गेडेकर यांचे मन व्याकुळ झाले. तसे ते नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्यांनी ही बाब आपल्या कार्यालयीन मित्रांना व काही सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितली. त्यांचा शब्दाला मान देऊन सामाजिक व आपुलकीच्या भावनेतून उपविभागीय अभियंता पुनम जीवतोडे, श्रेणी-२ सहायक अभियंता अखिल चिडे, स्वाती कुळसंगे, पंस विस्तार अधिकारी तथा बाळू बी ए पार्ट ऑफ लविंग युनिट चे संस्थापक अध्यक्ष अमित महाजनवार, अमृता महाजनवार, सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई, अक्षय दहीलकर, सिध्देश्वर दांडीकवार, कनिष्ठ लिपिक विलास नांदे, आशिष रंगारी यांनी पुढाकार घेत भास्करची तीनचाकी सायकल दुरुस्तीचा खर्च व घरगुती किराणा व आवश्यक साहित्य भेट देऊन सामाजिक जाणिवेचा परिचय दिला.
जलसंपदा विभाग चंद्रपूर येथील कर्मचाऱ्यांचे कार्य सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. प्रत्येकाने अशीच माणुसकीची भावना ठेवली तर याचा फायदा सर्वसामान्य ताळागळातील नागरिकांना होणार. या पीडित दिव्यांग कुटूंबाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करणार असे पंस विस्तार अधिकारी तथा बाळू बी ए पार्ट ऑफ लविंग युनिट चे संस्थापक अध्यक्ष अमित महाजनवार यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.