Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सामुदायिक प्रार्थना सर्वांकरीता खुले विचारपिठ - ॲड. राजेंद्र जेनेकर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सामुदायिक प्रार्थना सर्वांकरीता खुले विचारपिठ - ॲड. राजेंद्र जेनेकर विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - विठ्ठल-रुख्माई मंडळ नि...












  • सामुदायिक प्रार्थना सर्वांकरीता खुले विचारपिठ - ॲड. राजेंद्र जेनेकर
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
विठ्ठल-रुख्माई मंडळ निर्मीतीनगर व श्रीगुरुदेव सेवा मंडळ सहकारनगर यांचे संयुक्त विद्यमाने निर्मीतीनगर येथे विठ्ठल-रुख्मीनी प्राणप्रतिष्ठा निमित्ताने भजनसंमेलन सामुदायिक प्रार्थना अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सामुदायिक प्रार्थना हि सर्वांकरीता महत्वाची असून स्फुर्तीकेंद्र आहे, सामुदायिक प्रार्थनेचा विचार सर्वांना सामावून घेणारा आहे.असे विचार ॲड.राजेंद्र जेनेकर केंद्रीय सदस्य श्री गुरुदेव सेवा मंडळ प्रचार विभाग गुरुकुंज आश्रम यांनी व्यक्त केले.भजन संमेलनात रामपूर येथील भजनमंडळींनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला. याप्रसंगी आयोजक मंडळींना श्रीगुरुदेव मासिक भेट ॲड राजेंद्र जेनेकर यांचे हस्ते देण्यात आले त्यावेळी सुभाष पावडे ग्रामगीता परिक्षा संघटक, शैलेश कावळे युवक प्रमुख, अनिल चौधरी, देविदास मालेकर अधयक्ष, प्रकाश उरकुंडे सचिव, देव वांढरे, शिलाताई लांडे प्रचारक, आवारी, बोढे आदींची उपस्थिती होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top