Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आदिवासी बांधवांनी प्रगतीची उंच शिखरे गाठावित - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आदिवासी समाज भवनाचे लोकार्पण आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - अखिल भारतीय आदिवासीं विकास प...

















  • राजुरा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आदिवासी समाज भवनाचे लोकार्पण
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
अखिल भारतीय आदिवासीं विकास परिषद शाखा राजुरा आणि समस्त आदिवासी समाजाचे वतीने क्रांतीसुर्य भगवान बिरसमुंडा यांची १४७ वी जयंती उत्सवाचे आयोजन राजुरा येथे मोठय़ा उत्साहाने करण्यात आले. धरती आबा, जननायक, क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते म्हाडा कॉलनी परिसर राजुरा येथे आदिवासी समाज भवनाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी नवनियुक्त प्रकल्प स्तरीय आढावा नियोजन समितीचे अध्यक्ष भिमराव पा मडावी, सदस्य प्रदिप गेडाम, विकास मडावी व ललिताताई गेडाम यांच्या सत्कार सुध्दा करण्यात आला.    
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, आदिवासी बांधवांनी उच्च शिक्षण घेऊन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची उंच शिखरे गाठावित. भुलथापा देऊन समाजाला भ्रमीत करणाऱ्यांपासुन सावध रहावे. आपल्या आणि आपल्या समाजाच्या हितासाठी पुढाकार घ्यावा. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष तिरु लकिभाऊ जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष अरूण धोटे, गडचांदूरच्या नगराध्यक्षा सविता टेकाम, संदीप गवारी, अध्यक्ष प्रकल्प नियोजन समिती चे महाराज गोविंद जाधव, कोवेजी, चंद्रपूरचे तिरू भिमराव पा. मडावी, बांधकाम सभापती हरजितसिंग संधू, माजी सभापती निर्मला कुळमेथे, प्रदिप गेडाम, विनोद गेडाम, अंकुश कुळमेथे, शहराध्यक्षा तथा नगर सेवक संध्याताई चांदेकर, गडचांदूर चे नगरसेवक आनंद मेश्राम, शामराव कोटनाके, महीपाल मडावी, सिताराम मडावी, आयोजक अध्यक्ष सौ सूनंदाताई बोरकर, सचिव सिंधुताई नैताम, उपाध्यक्ष मंदाबाई उईक, कोषाध्यक्ष मंगलाताई उईके, सदस्य प्रतिमा कोरवेते, सरिताताई मडावी, सीमाताई कुळमेथे, सुशिलाताई टेकाम, रजनाताई कोडापे यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वेश्वरजी मडावी यांनी केले, सूत्रसंचालन प्रदिप मडावी यांनी तर आभार प्रदर्शन राजकुमार कुळमेथे यांनी केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top