Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: टेंबुरवाहीत आदिवासी समाज भवनाचे आमदार सुभाष धोटे व माजी आमदार ॲड. संजय धोटे यांच्या हस्ते लोकार्पण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स  राजुरा - आदिवासी गोंड समाज मंडळ, टेंबुरवाही यांच्या वतीने आयोजित क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची १४७ व्...

















आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स 
राजुरा -
आदिवासी गोंड समाज मंडळ, टेंबुरवाही यांच्या वतीने आयोजित क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची १४७ व्या जयंतीचे औचित्य साधून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे व माजी आमदार ॲड. संजय धोटे यांच्या हस्ते आदिवासी समाज भवनाचे लोकार्पण करण्यात आले. यासोबतच आदिवासी बांधवांचे समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
या प्रसंगी पंस सभापती मुमताज जावेद अब्दुल, उपसभापती मंगेश गुरनुले, माजी सरपंच रत्नमाला गेडाम, उपसरपंच चेतन जयपुरकर, दिलीप वांढरे, श्यामराव कोटनाके, अँड. मारोती कुरवटकर, आदिवासी गोंड समाज मंडळाचे अध्यक्ष गुणवंत कुडसंगे, सचिव पांडुरंग सिडाम, भास्कर धनवलकर, मनोहर रणदिवे, शंभू गेडाम, संतोष कुडसंगे, रोहन गेडाम, अर्जुन अलगमकर, सुधाकर अमृतकर, नथ्थू डोंगरे जलापती कोडापे, दशरथ चापले, बाळू ठाकरे, मंगेश जगताप यासह स्थानिक आदिवासी बांधव, गावकरी उपस्थीत होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top