Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आज पासून गोंदिया-बल्लारशाह पैसेंजर ट्रेन बल्लारशाह पर्यंत रेल यात्री असोसिएशन द्वारे पोस्टकार्ड पाठवा मोहिमेला मिळाले यश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आज पासून गोंदिया-बल्लारशाह पैसेंजर ट्रेन बल्लारशाह पर्यंत रेल यात्री असोसिएशन द्वारे पोस्टकार्ड पाठवा मोहिमेला मिळाले यश एच.एन. (राजेश) अरोर...







  • आज पासून गोंदिया-बल्लारशाह पैसेंजर ट्रेन बल्लारशाह पर्यंत
  • रेल यात्री असोसिएशन द्वारे पोस्टकार्ड पाठवा मोहिमेला मिळाले यश
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपुर -
दिनांक १३ नोव्हेंबर पासून चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशन बल्हारशाह द्वारे विविध मागण्या व विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पत्रव्यवहाराद्वारे जनआंदोलन सुरू करण्यात आले होते. या पत्रव्यवहार जनआंदोलनाला यश मिळाले असून आज पासून ट्रेन क्र. ०८८०१
चांदाफोर्टपर्यंत येणारी गोंदिया पैसेंजर बल्लारशाह पर्यंत धावणार आहे. हे ट्रेन दुपारी १:१५ मिनट ला बल्लारशाह स्थानकावर येणार असून दुपारी १:४५ ला 
बल्लारशाह स्थानकावरून सुटणार आहे.  
गाडी क्रमांक ०८८०१ - गोंदिया - बल्लारशाह पॅसेंजर आता पुन्हा बल्लारशाहपर्यंत धावेल. मध्य रेल्वे नागपूरच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. वास्तविक ही ट्रेन २०२० मार्च कोविड काळात बंद होती. अथक प्रयत्नांनी, या वर्षी २८ सप्टेंबर रोजी हि गाडी पुन्हा सुरू झाली आणि केवळ एका दिवसासाठी बल्लारशाहपर्यंत आली होती. नंतर ही गाडी फक्त चांदाफोर्टपुरतीच मर्यादित राहिली. चांदा फोर्ट स्टेशनवरून ट्रेन पकडण्यात आणि येताना प्रवाशांना खूप त्रास होत होता. गोंदिया-चांदाफोर्ट पैसेंजर ट्रेन बल्लारशाह येथे आणण्यासाठी चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशन बल्हारशाह यांनी माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्नशील होते. हि गाडी पुन्हा बल्लारशाह रेल्वे स्थानकापर्यंत यावी व येथूनच सुटावी या करिता हजारों लोकांनी पोस्टकार्ड पाठवा मोहिमेला योग्य प्रतिसाद देत पोस्टकार्ड पाठविले. आता या पोस्टकार्ड पाठवा मोहिमेला मिळाले यश मिळाले असून आजपासून गोंदिया-बल्लारशाह पैसेंजर ट्रेन बल्लारशाह पर्यंत येणार आहे. 
प्रवाशांच्या सोयीसाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहीर, मध्य व दक्षिण-पूर्व-मध्य दोन्ही रेल्वेचे महाव्यवस्थापक, डीआरएम यांनी ही गाडी बल्लारपूरपर्यंत आणल्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
आजपासून गोंदिया-बल्लारशाह पैसेंजर ट्रेन बल्लारशाह पर्यंत येणार असल्याने चंद्रपुर जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशनच्ये अध्यक्ष व झेडआरयूसीसी सदस्य श्रीनिवास सुंचुवार, उपाध्यक्ष व डीआरयूसीसी सदस्य विकास राजूरकर, सहसचिव व स्टेशन सल्लागार समिती सदस्य गणेश सैदाणे, ज्ञानेंद्र आर्य, रामेश्वर पासवान, राकेश बुरडकर, जगदीश परदेशी, किशोर इटनकर, सुधाकर पारधी, सुरज वाकुडकर, नितेश नायडू, रमेश निषाद, विजय तोटावार, शुभम बहुरिया, कुलदीप सुंचुवार, संजय पारधी, प्रवीण राऊत, प्रेम यादव, ज्ञानेश्वर उद्रके, दिनेश केशकर, आनंद तिवारी, राजनाथ तिवारी आदींनी आनंद व्यक्त करत रेल्वे विभागाचे आभार व्यक्त केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top