Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गॅरापत्त्ती - कोटगुल पोलीस नक्षल चकमक हत्यारासह आणखी एका नक्षलाचा मृतदेह सापडला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गॅरापत्त्ती - कोटगुल पोलीस नक्षल चकमक हत्यारासह आणखी एका नक्षलाचा मृतदेह सापडला आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स गडचिरोली - जिल्यातील गॅरापत्त...








  • गॅरापत्त्ती - कोटगुल पोलीस नक्षल चकमक
  • हत्यारासह आणखी एका नक्षलाचा मृतदेह सापडला
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
गडचिरोली -
जिल्यातील गॅरापत्त्ती - कोटगुल जंगल परिसरात १२ नोव्हेंबर रोजी सकाळी सी ६० जवान आणि नक्षलांमध्ये चकमक उडाली होती यात सेंट्रल कमिटी मेंबर मिलिंद तेलतुंबडे सह २६ नक्षलांच्या खात्मा झाला असून सदर परिसरात शोध मोहीम राबवित असताना आज हत्यारासह एका पुरुष नक्षलाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. 
सविस्तर वृत्त असे कि १२ नोव्हेंबर रोजी सकाळी सी - ६० जवान गॅरापत्त्ती- कोटगुल जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असताना धबा धरून बसलेले नक्षल पोलिसांच्या दिशेने अंधादून गोळीबार करीत होते त्याला प्रतित्तूर म्हणून सी ६० -जवान देखील गोळीबाराला सुरुवात केली पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलांनी जंगलाकडे पळ काढली नंतर शोध मोहीम राबवित सेंट्रल कमिटी मेंबर मिलिंद तेलतुंबडे सह २६ नक्षलांच्या  मृतदेह आढळून आले होते .
आज त्या परिसरात शोध मोहीम राबवित असताना हत्यारासह एका नक्षलाचा मृतदेह आढळून आला असून त्याची ओळख पटली आहे . सुखलाल परचाकी वय ३१ असे त्याचे नाव असून  डी व्ही सि  मेंबर आहे. सदर घटनास्थळी अजूनही शोध मोहीम सुरूच असून आणखी नक्षल्यांच्या मृतदेह सापडण्याची शक्यता आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top