आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
गडचिरोली -
दि. 16.ऑक्टो. 2021 रोजी अंदाजे 18 ते 22 च्या संख्येने हत्तीचा कळप चारवाही उपक्षेत्रातील मर्मा, ग्यारापत्ती उपक्षेत्रातील बोटेझरी, भिमनखोजी, देवसून या भागातून भ्रमण करीत 17 ऑक्टो. 2021 ला चारवाही उपक्षेत्रातील मर्मा, सुरसुंडी उपक्षेत्रातील आंबेझरी या मार्गातून 18 ऑक्टो. 2021 रोजी फुलकोडो क्षेत्रात आला. 19 ऑक्टो. 2021 ते आज 16 नोव्हें .2021 पर्यंत सदर कळप पश्चिम गुरुमगांव, दक्षिण धानोरा व उत्तर धानोरा वनपरीक्षेत्राच्या सिमेलगत असलेल्या दक्षिण धानोरा परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 580,579,578,577 व पश्चिम मुरुमगांव परीक्षेत्रातील कक्ष क्रमांक 631,632,633 या क्षेत्रात वावरत आहेत.
सदर क्षेत्रात पश्चिम दिशेने येरकड ते मालेवाडा मार्ग, दक्षिण दिशेने येरकड ते मुरुमगांव मार्ग व पुर्व दिशेने मुरुमगांव ते मालेवाडा मार्ग लागुन आहे. सदर क्षेत्रात हत्तीचा कळप आजपर्यंत वर नमुद कक्ष क्रमांकात अंदाजे 1000 ते 1200 हेक्टर क्षेत्रामध्ये भ्रमंती करीत आहेत.
सदर हत्तीचा कळप मागील 28 दिवसांपासुन दिवसभर जंगलात फिरुन बांबु, झाडांची पाने, साल व इतर पदार्थ खात फिरत असतात व सायंकाळी 6.00 त 8.30 वाजताचे दरम्याने हत्तीचा कळप दाट जंगलातून बाहेर येतात व वर नमुद बोडी/वनतलावात असतात. सकाळ पर्यंत बोडील व लागुन असलेल्या शेतात फिरतात काही प्रमाणात धान पिक खातात नुकसान करुन सकाळी 4.30 ते 6.00 वाजताचे दरम्यान परत दाट जंगलात शिरतात.
हत्तींच्या कळपा बद्दल माहिती - सन 2014 साली खाणकाम आणि इतर अडथळयामुळे हिराकुंड जलाशयाच्या जवळच्या क्षेत्रातुन हत्तींच्या कळपाने त्यांचा अधिवास सोडला. सदर कळपाला ME4/चंदा हे सांकेतीक नाव ठेवून सन 2017 पासुन बारकाईने निरीक्षण केले जात आहे. सदर कळप रेडिओ कॉलर केलेला होता परंतु सध्या बंद आहे.
अशासकीय संस्था Wild Life SOS चे डॉ.स्वामीनाथन यांचे निरीक्षणानुसार सदर कळपात 21 हत्ती व छत्तीसगड राजनांदगांव वनविभागाचे उप वनसंरक्षक यांचे निरीक्षणानुसार कळपात 22 हत्ती आहेत. तथापि , प्रत्यक्षात गडचिरोली वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घेतलेले व्हिडीओ, फोटो द्वारे 18 हत्ती असल्याचे आढळले. त्यामुळे सदर कळपात 18 ते 22 हत्ती असावे असे मत आहे. गडचिरोली वनविभागाकडून सुरु असलेल्या उपाययोजना (वनकर्मचारी, गावकरी व हत्तींचे संरक्षणाकरीता करण्यात येत असलेल्या वेगवेगळया उपाययोजना) पुढील प्रमाणे आहेत.
- क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमध्ये जागृतता व संवेदनशिलता वाढविण्यासाठी प्रशिक्षण व सभांचे आयोजन.
- त्याच प्रमाणे हत्तीबाबत माहितीचे भितीपत्रके , हॅन्डबिल,पॉवर पाईट प्रेझेंटेशन चे माध्यमातुन कर्मचाऱ्यांना माहिती दिली आहे.
- लोकांची जागृतता व संवेदनशिलता वाढविण्यासाठी सभांचे आयोजन करुन समजावून सांगण्यात येत आहे.
- दिवसभर हत्तींच्या हालचाली व इतर माहिती सुरक्षित अंतर ठेवून माहिती गोळा करण्यात येत आहे.
- रात्रीच्या वेळी हत्तीच्या कळप ज्या गावाच्याजवळ आहे तेथे वनकर्मचारी वास्तव्याने राहून गावकऱ्यांना मदत करीत आहेत.
- गावकऱ्यांना पथदिवे,ब्लँकेट, मशाल इत्यादीचे वाटप केलेले आहेत.
- फटाके, मशाली, ढोल इत्यादींची तयारी करुन ठेवली आहे.
- पिक नुकसानी प्रकरणात लवकरात लवकर नुकसान भरपाई मंजुर केलेली आहेत. दिनांक 10.11.2021 पर्यंत एकूण 69 प्रकरणात रु.7,97,805/- आर्थिक सहाय्य संबंधित शेतमालकांना देण्यात आले आहे. तसेच सदर कळपाकडून एकूण 22 इमारतींचे झालेले नुकसानीचा तपशिल पुढील प्रमाणे आहे. दिनांक 20 ऑक्टोबर 2021 रोजी मुंजालगोंदी गावातील 3 ईमारती. दिनांक 04 नोव्हेंबर 2021 ला भोजगाटा गावातील 5 ईमारती. 10 नोव्हेंबर 2021 ला फुलकोडो गावातील 3 ईमारती. दिनांक 15 नोव्हेंबर 2021 रोजी अर्जुनी गावातील 11 ईमारती हत्तीचा अधिवास सुधारण्यासाठी करावयाचे काम-सदर हत्तीचा कळप या क्षेत्रात कायम वास्तव्याने राहिल्यास हत्तीचे अधिवास क्षेत्र व गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुढील उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- वनवणवा नियंत्रण करणे- जंगलात वनवणवा लागुन वनस्पती तसेच हत्तींना नुकसान होऊ नये याकरीता जाळ रेषा काढणे इत्यादी कामे वेळीच करणे आवश्यक आहे.
- वनतलाव-उन्हाळयाचे दिवसांत जंगलातपाण्याची कमतरता येऊ नये याकरीता अस्तीत्वात असलेल्या वनतलावापाशी बोअरवेल खोदून व तयार सौर ऊर्जेवर चालणारा पाण्याचा पंप बसवुन पाण्याची सोय करणे.ज्या क्षेत्रात नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत नाही अशा ठिकाणी कृत्रीम पाणस्थळे, निर्मितीची कामे प्रस्तावित करणे. नैसर्गिक स्त्रोत असलेले लहान-मोठया नाल्यावर कोल्हापूरी बंधारे, वनराई बंधारे बांधणे या कामाची आवश्यकता आहे.
- कुरण व वैरण विकास-जंगलातील वैरण कमी होऊन हत्तींना जंगलाबाहेर येऊ न देण्यासाठी कुरण व वैरण विकासाची कामे करणे.
- सौर कुंपण- वनालगत असलेल्या शेता सभोवताल सौर कुंपण लावणे.
- हत्ती प्रतिबंधक चर खोदणे- गाव सिमेलगत हत्ती प्रतिबंधक चर खोदणे.
- माहुतांची भरती करणे- कमलापूर हत्ती कॅम्प येथील प्रशिक्षीत माहुतांकडून नवीन उमेदवारांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षीत करणे.
- प्रत्येक गावात हत्ती मित्रांची चमु तयार करणे.
- हत्ती निरीक्षण पथक तयार करुन हत्तींच्या हालचालीवर देखरेख ठेवणे.
- पशुवैद्यांची नियुक्ती करणे.
- 2 नवीन वाहनांची खरेदी- Rapid Resque Team तयार करुन सदर टिम करीता नवीन मोठी वाहने व 4 Wheel drive असलेली वाहने खरेदी करणे.
- कॅमेरा ट्रॅप, ड्रोन कॅमेरा, स्मार्ट स्टिक, तंबु, मचाणी, दुर्बीण, टॉर्च, कॅमेरा, मेगा फोन, अनैडर, पथदिवे, रेडीओ कॉलर, Infrared sensor इत्यादी साहित्य खरेदी करणे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.