- जननायक बिरसा मुंडा यांना भारतरत्न पुरस्कार द्या
- बिरसा क्रांती दल यांचे तहसीलदार मार्फत पंतप्रधान यांना निवेदन
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
बिरसा मुंडा यांचे राष्ट्र व समाजाप्रती असलेले निस्वार्थ समर्पण व बलिदान पाहता त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावे. अशी मागणी बिरसा क्रांती दलने केली आहे. या मागणीचे निवेदन पंतप्रधान, केंद्र सरकार यांच्या नावे बिरसा क्रांती दलने दंडाधिकार्यांना दिले. हे निवेदन तहसीलदार हरीश गाडे यांनी स्वीकारले. यावेळी बिरसा क्रांती दलाचे जिल्हा अध्यक्ष संतोष कुळमेथे, जिल्हा युवक उपाध्यक्ष सुशील मडावी, राजूरा तालुका महासचिव नरेंद्र कूलमेथे, पोंभुर्णा तालुका युवा अध्यक्ष आकाश गेडाम, तालुका संघटक राजूरा अरुण कुमरे, देवानंद रांझीकर, तालुका कोषाध्यक्ष, रमेश आडे, तालुका कार्याध्यक्ष, तालुका सचिव नटवरलाल खंडाते, सामाजिक कार्यकर्ते मडावी तसेच इंदिरानगर व इतर सामाजिक संघटना ह्यांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनानुसार, जननायक बिरसा मुंडा यांची 146 वी जयंती 15 नोव्हेंबर रोजी तालुक्यात साजरी करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिकारकांची भूमिका महत्त्वाची आहे. समग्र स्वतंत्रता समर यांचा समन्वय बिंदू जननायक बिरसा मुंडा हे संपूर्ण राष्ट्र-समाजाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. इतिहासात जननायक बिरसा मुंडा हे असे नायक होते ज्यांनी एकोनवीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आपल्या क्रांतिकारी विचाराने आदिवासी समाजाची स्थिती आणि दिशा बदलून एका नव्या सामाजिक आणि राजकीय युगाची सुरुवात केली. बिरसा मुंडा यांनी काळ्या कायद्यांना आव्हान देऊन ब्रिटिश साम्राज्याला कंठस्नान घातले. पराक्रम आणि सामाजिक प्रबोधनाच्या जोरावर बिरसा हे खर्या अर्थाने तत्कालीन काळातील एकलव्य होते.
आदिम संस्कृतीची खिल्ली उडवणे बिरसा यांना सहन होत नव्हते. त्यांनी अंधश्रद्धाळू ढोंगीपणाचे खंडन केले आणि लोकांना हिंसा आणि मादक पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्याकाळी निष्पाप आदिवासींना अधिक त्रास देण्याचे काम इंग्रजांनी आणि सावकारांनी, जमीनदारांनी, जहागीरदारांनी केले. या विरोधात अवघ्या 25 वर्षांच्या अल्पशा आयुष्यात बिरसा मुंडा यांनी उठाव केला आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. आदिवासी समाजावरील होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध लढा देत आदिवासींना प्रोत्साहन देऊन त्यांचे जल, जमीन आणि जंगल वाचवण्यासाठी संघटितपणे काम करणार्या बिरसा मुंडा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावे, अशी मागणी पंतप्रधान, केंद्र सरकारला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.